इंडियन टीव्ही न्यूज जिल्हा प्रतिनिधी प्रताप नागरे वाशिम
शहर अध्यक्षाच्या निवडीवरुन भाजपात जुन्या पदाधिकाऱ्यांची नाराजी
आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्याचे वरिष्ठांना निवेदन
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या
निवडणुक लक्षात घेता विविध पक्षांमध्ये मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. या पाश्वभूमिवर नुकतीच भाजपाची वाशिम शहर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. परंतु ही निवड मान्य नसल्याचे निवेदन कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व प्रदेश कार्याध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांना दिले.या दिलेल्या शहराध्यक्षाच्या निवडीवरून चांगलाच गदारोळ शहरात माजला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीलाच भाजप पक्षामध्ये अंतर्गत गटबाजी पहावयास मिळाली याचा फटका लोकसभेत भाजप पक्षाला बसला.विधानसभा निवडणुकीमध्ये स्थानिक नेत्यांची नाराजी दूर करन जिल्ह्यात दोन ठिकाणी भाजपचा झेंडा फडकविण्यास यश भाजपने मिळविले.
वाशिम-मंगरुळपीर विधानसभा मतदार संघामध्ये निवडणुक लढविण्यास राहुल तुपसांडे, दीपक ढोके आदींनी तयारी केली होती. परंतु ऐन वेळी श्याम खोडे यांना उमेदवारी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारंजा येथे सभा घेवून दोन्ही मतदार संघातील नाराज पदाधिकारी व कार्यकर्त्यांत समेट घडवून आणत सर्व धुरा राजु पाटील राजे यांच्याकडे सोपविली. राजु पाटील यांनी जोमाने कामाला लागून तळागळातील कार्यकर्त्याची नाराजी दूर करत दोन्ही मतदार संघावर भाजपचा झेंडा फडकवला. विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षहितासाठी अहोरात्र मेहनत केल्याने राजू पाटील राजे यांची पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याचे बोलल्या जात होते. परंतु तस काही झालं नाही.राजु पाटलांना बाजूला करून पुरुषोत्तम चितलांगे यांच्यावर
जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलीं. यामुळे राजु पाटील राजेचे समर्थक कमालीचे नाराज झाले.आमदारांनी जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे यांच्या खांद्यावर हात ठेऊन पाटणी समर्थकांना कार्यकारणीत स्थान दिल्याने अंतर्गत कलह अजून वाढला. राजु पाटील राजे यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारचे पदे देण्यात आली नाहीत.या सर्व घटना घडामोडी एका निवेदनाद्वारे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वरिष्ठाकडे निवेदनाद्वारे कळविल्या आहेतं. या निवेदन वर बुथ प्रमुख विनोद मगर, भाजपा भटके विमुक्तआघाडी जिल्हाध्यक्ष सौ. कविता खराट, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव सुरज चौधरी, भाजपा वाशिम शहर सचिव शंकर शेंडे, अनुसूचित शहराध्यक्ष मदन राठी, राजाभैय्या पवार, गजानन ठेंगडे, कपिल सारडा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्याच्या स्वाक्षऱ्या आहेत.