हिंदी सक्ती विरोधात “मराठी बाणा” टिकवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे , महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राजसाहेब ठाकरे व मराठी भाषिकांनी उठवलेला आवाज आणि त्या उठावाला शरन जाऊन सरकारला हिंदी सक्तीचा निर्णय रद्द करावा लागला, सदरील उठावाला मिळालेलं यश हे मराठी एकजुटीचा विजय आहे आणि भविष्यात होणाऱ्या महाराष्ट्र द्रोही कारवायांना इशाराच आहे, आज पर्यंत जेव्हा केव्हा महाराष्ट्र विरोधी निर्णय आणि महाराष्ट्र अस्मितेच्या विरोधात कारवाया झाल्यात त्या त्या वेळी ठाकरे कुटुंबीय हे महाराष्ट्रसाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी लढलेले आहेत, सदरील मराठी विजय साजरा कतांना
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरपूर शहर व तालुक्याच्या वतीने आज दिनांक.२/७/२०२५ रोजी सकाळी ११ वा.आतिषबाजी करून एकमेकांना पेढे भरून जल्लोषाने आनंद उत्सव साजरा केला. त्याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भरतसिंग राजपूत जिल्हा उपाध्यक्ष. राजू टेलर उपजिल्हासंघटक, तालुकाप्रमुख युवराज पाटील ,जितेंद्र पाटील वाहतुकसेना जिल्हाध्यक्ष, पिंटू शिंदे, मुकेश शेवाळे मंगलसिंग भोई ,बबलू शेख वाजीत मलिक सुकलाल पावरा, देवाजी पाटील ,योगेश सूर्यवंशी योगेश ठाकरे ,जावेद शेख मोहसीन शेख आधी उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण तर्फे राकेश नवनीत चौधरी जिल्हाध्यक्ष . सोनू राजपूत जिल्हाध्यक्ष मनसे विद्यार्थी सेना, राहुल शिराळे जिल्हा उपाध्यक्ष पुनमच मोरे तालुकाध्यक्ष , पंकज मराठे शहराध्यक्ष, राकेश पाटील, विकी पाटील, नक्षत्र पाटील, छोटू राजपूत, रजसिंग कोळी, प्रकाश कोळी तथा पदाधिकारी उपस्थित होते.