पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र संघाच्या बीड जिल्हाअध्यक्षपदी वाजेद पठाण,उपाध्यक्षपदी राजरतन डोंगरे व माजलगाव तालुकाध्यक्षपदी परमेश्वर चांदणे उपाध्यक्षपदी किसन पवार यांची नियुक्ती !
पत्रकार परमेश्वर चांदणे इंडियन टीव्ही मराठवाडा चिफ ब्युरो
सुरक्षा समिती महाराष्ट्र संघाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी वाजेद पठाण,जिल्हा उपाध्यक्षपदी राजरतन डोंगरे,जिल्हासचिवपदी जावेद पठाण,जिल्हा सहसचिव पदी शेख मुजफ्फर, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र संघाचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार साहेब यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आलेली आहे मागील अनेक वर्षापासून पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर पुढाकार घेऊन वाचा फोडण्याचे काम वाजेद पठाण
,राजरतन डोंगरे यांनी केले आहे आणि पत्रकारांचे प्रश्न पत्रकार गृहनिर्माण संस्था,आधीस्विकृती कार्ड,घरकुल ,पत्रकारावर होत असलेले हल्ले या अनेक विविध विषयावर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे सुरक्षा समिती महाराष्ट्र यांच्या वतीने याविषयी प्रश्न मांडण्याचे प्रयत्न करणार असे विद्यमान बीडजिल्हा अध्यक्ष वाजेद पठाण,जिल्हा उपाध्यक्ष राजरतन डोंगरे,यांनी या नियुक्तीवेळी सांगितले आहे या नियुक्तीमुळे सर्वांच्या वतीने कौतुकाची थाप मिळत आहे पत्रकार सुरक्षा समिती संघाच्या माजलगाव तालुकाध्यक्षपदी परमेश्वर चांदणे, सचिव पदी अखिल शेख ,उपाध्यक्षपदी किसन पवार ,यांची नियुक्ती पत्रकार सुरक्षा समिती बीड जिल्हाअध्यक्ष वाजेद पठाण यांच्याअध्यक्षतेखाली करण्यात आलेली आहे या वरील नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांना यावेळी नारायण हाके पाटील,नुमान भैया चाऊस, ज्योतिराम पांढरपोटे
,परमेश्वर सोळंके,अनंतघडसिंगे
खय्युम पठाण ,विजय पवार अखिल कुरेशी यांनी पत्रकार सुरक्षा समिती च्या नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे