प्रभाग क्र.12 मध्ये शेख अनिसभाईच्या उमेदवारीला पसंती.
विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी अनिसभाईंना विजयी करण्याचा नागरिकांनी केला संकल्प.
माजलगाव प्रतिनिधी दि.14
माजलगाव नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये निवडणुकीची चुरस रंगू लागली आहे.यावेळी खुल्या प्रवर्गातील उमेदवार म्हणून
शेख अनिसभाई यांना मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून पसंती दिली जात आहे.दरम्यान वार्डातील
विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी अनिसभाईंना विजयी करण्याचा नागरिकांनी केला संकल्प.
शहरातील प्रभाग क्रमांक 12 मध्ये ओपन उमेदवारीकडे मतदारांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.समाजात शांत स्वभाव,सर्वधर्म समभावाचा संदेश आणि विकासकामात लक्ष देणार असल्याची भूमिका असल्याने या प्रभागातील भूमिपुत्र शेख अनिसभाई यांना स्थानिकांचा आपलाच उमेदवार असा विश्वास लाभला आहे.अनिसभाई यांनी प्रभागात समाजसेवा,गरजूंना दिलेले सहकार्य आणि सर्व पक्षीय नेत्यांशी जुळवून घेतलेले सलोख्याचे संबंध,हे त्यांचे प्रचारात मोठं भांडवल ठरणार आहेत.
ते अनेक वर्षापासून लोक संपर्कात असून समाजसेवेचे काम करताना दिसतात.प्रभाग क्रमांक 12 मध्ये त्यांनी ओपनमध्ये उमेदवारी दाखल करण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या निर्णयाचे वार्डात सर्वत्र स्वागत होत असून त्यांना प्रथम क्रमांकाची पसंती मिळत आहे.
मतदारांकडून त्यांना पाठिंबा मिळत आहे.त्यांनी वार्डात अनेक गरिबांची कामे केली आहेत.घरकुल मिळवून देणे,शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे.प्रभागातील विविध नागरी समस्येसाठी जनआंदोलने ही त्यांनी केली आहेत.त्यांची उमेदवारी प्रभाग 12 मध्ये विजयाचा शिलेदार नगरसेवक म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.त्यामुळे येत्या नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 12 मधील ओपनची निवडणूक जनतेने हाती घेतल्याची स्थिती असून त्यांना प्रभावात सर्वत्र वाढता पाठिंबा मिळत आहे.