दैनिक कलमवीर पी एन देशमुख
भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिन समारंभ 26 जानेवारी 2026 रोजी संपन्न होत होत आहे. अमरावती शहराचा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा यावर्षी अमरावती शहर परेट मैदान मुख्य पोलीस आयुक्तालय अमरावती येथे साजरा होणार आहे. या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री दादाजी भुसे हे उपस्थित असणार आहेत.
यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे मुख्य आकर्षण शालेय विद्यार्थ्यांची संगीत कवायत असणार आहे. माननीय मंत्री शालेय शिक्षण श्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून देशभक्तीपर गीतावर सामूहिक कवायत संचालन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. 26 जानेवारीला विविध कार्यक्रमअंतर्गत राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीतांवरील कवायत संचलन आयोजित केलेले आहे.
या सामूहिक कवायत संचालनाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त, आरोग्य जागृती, शारीरिक दृष्ट्या कसरत /व्यायाम करण्यासाठी प्रेरित करणे हा आहे.
सामूहिक कवायत संचालनास गावातील शहरातील मैदानाच्या क्षमतेनुसार विद्यार्थी एका मैदानावर एकत्र करून ही कार्यक्रम मोठ्यागावांमध्ये घेण्यात येणार आहे.याकरीता जिल्ह्यातील मोठ्या शाळांमधील मैदानांच्या उपलब्धतेनुसार दोन ते तीन शाळा मिळून सामूहिक कवायत करण्यात येणार आहे. तसेच शासकीय झेंडावंदन कार्यक्रमानंतर प्रत्येक शाळांमध्ये सामूहिक कवायत संचलन कार्यक्रम आयोजन करण्यात येणार आहे. याकरता वीस मिनिटांचा मार्गदर्शक व्हिडिओ तयार करण्यात आला असून त्याची लिंक सर्व शाळांच्या संबंधितांपर्यंत यापूर्वीच पोहोचवण्यात आली आहे. नमुना मार्गदर्शक व्हिडिओ नुसार कवायत संचलन आयोजित करणेबाबत सूचना दिलेल्या आहेत.कार्यक्रमास आपल्या परिसरातील माननीय लोकप्रतिनिधी, इतर शासकीय अधिकारी,ग्रामस्थ,शिक्षण प्रेमी पालक व समाजसेवी गणमान्य प्रतिनिधींना आमंत्रित करावयाचे आहे राज्यभरात सदर कार्यक्रम सर्व शाळांमधून 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात येईल.
अमरावती शहर परेड मैदानावर शिक्षण विभागाचे देशभक्तीपर गीतावर आधारित सामूहिक कवायत संचलन कार्यक्रम होणार असून सदर कार्यक्रमांमध्ये एकूण सहा शाळेचे दोन हजार विद्यार्थी एकत्र कवायत संचलन करणार आहे यामध्ये जिल्हा परिषद माध्यमिक मुलींची शाळा अमरावती,होली क्रॉस मराठी माध्यमिक शाळा अमरावती, होली क्रॉस इंग्रजी माध्यमिक शाळा अमरावती, सेंट झेवियर इंग्लिश स्कूल अमरावती, श्री गणेशदास राठी माध्यमिक विद्यालय अमरावती, श्री प्रेमकिशोर सीकची विद्यालय विद्यालय अमरावती, ह्या शाळेचा समावेश असणार आहे सदर कार्यक्रमाची सराव येत्या दीड महिन्यापासून शाळा स्तरावर घेण्यात आलेली आहे ज्या परेड मैदानावर सामूहिक कवायत कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये 21 जानेवारीपासून सर्व काही शाळेचे विद्यार्थी एकत्र येऊन सामूहिक सराव त्यांच्या पिटी शिक्षकांसह उपस्थित राहून करून सर्व प्रॅक्टिस करत आहे सर्व विद्यार्थ्यांमध्ये सर्व शाळांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे आज दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी माननीय शिक्षण महोदय यांचे स्वीयय सहाय्यक श्री सोनवणे साहेब यांचे उपस्थितीत रंगीत तालीम परेड मैदानावर घेण्यात आलेले आहे .विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाच्या आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे विद्यार्थ्यांच्या कवायती नंतर सर्व विद्यार्थ्यांना फळे खाऊ नाश्ता पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचा आणि आनंदाचा वातावरण निर्माण झालेले आहे त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतून सामूहिक ही शाळा शाळा स्तरावर घेतली जाणार आहे त्या प्रकारचे सराव शाळेमधून नियोजन करण्यात आलेले आहे. तालुका स्तरावरसुद्धा सामूहिक कवायत तीन-तीन शाळा एकत्र मिळून मुख्य ध्वजावंदनाच्या ठिकाणी घेण्याचे .नियोजन करण्यात आलेले आहे यामध्ये माननीय शिक्षण उपसंचालक श्रीमती टाके मॅडम जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी श्रीमती प्रिया देशमुख मॅडम यांच्या पुढाकाराने मार्गदर्शनाखाली सर्व टीमच्या मदतीने हा कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने घेण्यात येणार आहे.