जि प प्रा शाळा शिवपुरी २६ जानेवारी २०२६ रोजी भारत देशाचा ७७ वा प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवपुरी नगरीचे सरपंच सौ सूनिता अवधुत तेलुरे व सरस्वती संतोष कड उपसरपंच यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिप प्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष रामा कांबळे उपाध्यक्ष . प्रकाश हवरगे. बंटी करे दत्ता जाधव प्रमुख अतिथी म्हणून गावचे पोलिस पाटील संतोष घारके व सर्व ग्रा पं.सदस्य समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते. सुत्रसंचलन सहशिक्षक धोपे मॅडम यांनी केले. . यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.