पुणे.
अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणातून मोहन फडतरे याच्यासह ५ जणांची विशेष न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी ससबळ पुराव्य अभावी निर्दोष मुक्तता केली.
फडतरे याच्या वतीने Ad . राहुल नायर यांनी कामकाज पाहिले. पीडितेने फडतरे याला प्रथमच न्यायालयात पाहिल्याचे सांगितले. तसेच, त्याची ओळख परेड घेण्यात आलेली नव्हती. सीसीटीव्ही फुटेज सादर करताना कायदेशीर प्रक्रियेचे पालन झाले नाही.
फडतरे हा अपंग असल्याचे नमूद करत त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आल्याचा युक्तिवाद अॅड. नायर यांनी केला. त्यांना Ad.. प्रमोद धुळे, Ad.. तेजस सोनार आणि Ad.. दीपेंद्र तुपे यांनी सहकार्य केले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध पुरावे तपासल्यानंतर न्यायालयाने पीडितेच्या साक्षींमध्ये तफावत असल्याचे नमूद करत निकाल दिला. याप्रकरणी, ऑक्टोम्बर २०२० मध्ये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
रिपोर्टींग कृष्णा इंगोले.