‘आनंदी युनिव्हर्स फाऊंडेशन’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अत्यंत प्रतिष्ठित *‘राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२६’* सोहळ्यात *‘दैनिक लोकयुवा’चे मुंबई-ठाणे जिल्हा प्रतिनिधी श्री. काशीनाथ धोंडू देसले* यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल *राष्ट्रीय पुरस्काराने* सन्मानित करण्यात आले आहे.
*“कर्तृत्वाचा राष्ट्रीय सन्मान, गौरवाचा सर्वोच्च क्षण”* या संकल्पनेवर आधारित हा भव्य सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला.
पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात श्री. काशीनाथ देसले यांनी दिलेल्या मोलाच्या योगदानाची दखल घेऊन फाऊंडेशनच्या वतीने त्यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
कार्यक्रमात त्यांना संस्थेचे *विशेष बोधचिन्ह, भारताचा नकाशा कोरलेले मानाचे पदक आणि सन्मानपत्र* देऊन गौरविण्यात आले.
देशनिर्मिती आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आल्याची माहिती *मुरबाड तालुका प्रतिनिधी किशोर पवार* यांनी दिली.
श्री. देसले यांना मिळालेल्या या राष्ट्रीय सन्मानामुळे ‘दैनिक लोकयुवा’ परिवारासह संपूर्ण मुरबाड तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.