तिरोडा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात संपन्न

*तिरोडा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात संपन्न..!*

*रविकांत बोपचे व प्रमुख पदाधिकारीच्या हस्ते अल्पोहार वितरण..!*

आज तिरोडा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहरातील राणी अवंतीबाई लोधी यांच्या स्मारक जवळ जागतिक आदिवासी गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अल्पोहार वितरण कार्यक्रम युवा नेते रविकांत बोपचे व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.

दरवर्षी तालुक्यातील विविध आदिवासी संघटना व समाज बांधवांकडून जागतिक आदिवासी गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या निमित्ताने गाव-शहरातील आदिवासी समाजातर्फे भव्य रॅली चे आयोजन केले जाते. याप्रसंगी आदिवासी समाज बांधव विविध कला संस्कृती चे प्रदर्शन करीत असतात. आज तिरोडा येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त निघालेल्या रॅली चे तिरोडा राष्ट्रवादी च्या वतीने युवा नेते रविकांत बोपचे यांच्या नेतृत्वात जंगी स्वागत करून अभिवादन करण्यात आले यासह आदिवासी बांधवांना अल्पोहार वितरण करण्यात आले.

यावेळी मा. रविकांत बोपचे यांच्यासह विधानसभा अध्यक्ष श्री ओमप्रकाश रहांगडाले, नासिर घानीवाला, शहर अध्यक्ष रवींद्र वंजारी, महासचिव सोमेंद्र (मुन्ना) उपवंसी, आशिष येरपूडे, महिला शहर अध्यक्ष मिनाक्षी (टिना) हिरापुरे, राजश्री उपवंशी, रजनीकांत शरणागत, ,विजय बुध्दे, युवा अध्यक्ष रविकुमार कुर्वे, संजय धूर्वे, प्रकाश करीहार, उमाशंकर पटले, मंगेश हिरापूरे, संनी उपवंशी, नितीन उके, सरपंच रवींद्र भगत, सुमित करिहार, राजू भाऊ तुप्पट, उपसरपंच राजू भोयर, टिपू सय्यद, जॉनी सय्यद, अकबर शेख, आदिंसह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रवीण शेंडे
ब्युरो चीफ
गोंदिया.
मो. 9834486558

Leave a Comment