शहीद मिश्रा वोके्सनल कॉलेज समोर गंदगीचे साम्राज्य.
परिसरातील लोकांच्या प्रकृर्तीवर मोठ्या प्रमाणात परिणाम.
तिरोडा – तिरोडा इथे शंकर शिक्षण संस्था द्वारा संचालित शहीद मिश्रा वोके्सनल कॉलेज च्या मैदानात मोठ्या प्रमाणात गंदगी निर्माण झाली आहे त्यामुळे परिसरातील लोकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचे जाणवत आहे, त्या घाणी मुळे तिथे डुक्करांचा वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे.संस्थे चे संचालक मात्र निष्काळजी पणाने वागत आहेत. या कॉलेज मध्ये शिकणाऱ्या विध्यार्थांवर यांचा काय परिणाम होईल याकळे शाळा संचालक आणि प्राचार्य यांचे लक्ष नाही. आता सध्या मलेरिया, डेंगू, चिकन गुनिया याची साथ सुरु आहे आणि या घाणी मुळे आजू बाज्जू च्या परिसरातील राहणाऱ्या लहान मुलांवर आणि लोकांवर परिणाम होऊन जीव जणांच्या धोका निर्माण झाला आहे.महाराष्ट्र न्यूज live चे प्रतिनिधी प्रवीण शेंडे यांनी नगर परिषद तिरोडा यांना लेखी स्वरूपात पत्र सुद्धा दिले आहे पण नगर परिषद कार्यालयानी सुद्धा त्यांच्यावर कोणतीही कारवाई दिनांक 20/8/2024 पर्यंत केली नाही. समजा जर एखाद्या वेक्तीचे जीव गेले तर याला जबाबदार कोन राहील असा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील लोकांची मागणी आहे शाळा संचालकांनी किंवा नगर परिषदेने त्वरित या गंदगीचे वेवस्था करून लोकांचे जीव जाण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करावे.
प्रवीण शेंडे
प्रतिनिधी गोंदिया
मी. 9834486558.