
पत्रकार परमेश्वर चांदणे इंडियन टीव्ही न्यूज मराठवाडा
शेतात जात असताना अचानकपणे रानडुकराने जोरदार धडक दिल्याने जखमी झालेल्या माजलगाव तालुक्यातील ढेपेगाव येथील शेतकरी श्री किसन रंगनाथ काळे ५८ यांचा बीड येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली माजलगाव तालुक्यातील दिपे गाव येथील शेतकरी श्रीकिसन काळे हे मागील पंधरा दिवसापूर्वी सकाळी नऊच्या सुमारास आपला मुलगा अमोल यांच्यासह शेतात आंबे आणण्यासाठी गेले असताना अचानक शेतातून समोर आलेल्या रानडुकराने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला या हल्ल्या श्री किसन यांच्या पोटात जबर वार बसला व त्यांच्या आतड्यास इजा झाली यावेळी अमोल याने अर्धा ओरड केल्याने रानडुक्कर पळून गेले यानंतर जखमी श्री किसान यांना तातडीने माजलगाव येथील खाजगी रुग्णालय प्राथमिक उपचार करून बीड येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले त्यांच्यावर पंधरा दिवस उपचार केल्यानंतर उपचार सुरू असताना आखिरत्यांचा दिनांक 18 जून रोजी मृत्यू झाला त्यांच्यावर दीपे गाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले महेश शेतकरी श्री किसन काळे यांच्या पश्चात पत्नी पाच मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे मयत काळे यांच्या कुटुंबाला शासनाने नियमाप्रमाणे आर्थिक मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांच्या कडून होत आहे याच दरम्यान या परिसरात रानडुकरांची संख्या झपाट्याने वाढत असून या रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी ही मागणी शेतकरी वर्गातून होत आहे