
तातडीने मागणी पूर्ण न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार
धुळे जिल्हा परिवहन अधिकारी व आगार व्यवस्थापकांना निवेदन सादर
प्रभाग क्र.११ येथील पूर्वी असलेल्या लोकसंख्येच्या तुलनेत आता झपाट्याने वाढ होत आहे त्यामुळे शहरातील रस्ते व शहराची सीमा सुद्धा दूरपर्यंत वाढत आहेत पूर्वी पारोळा रोड व प्रकाश टॉकीज चौकात एकमेव असलेला बस थांबा कमी लोकवस्ती असल्याने पुरेसा होता परंतु आता झपाट्याने वाढत असलेला कॉटन मार्केट परिसर तसेच त्यामागे असलेल्या नवीन कॉलनी व त्यात येणारा परिसर हा फार मोठा आहे.
रामचंद्र नगर, स्वामीनारायण कॉलनी,पवन नगर, वाखारकर नगर, भगामोहन नगर,विश्वकर्मा नगर, शिव कॉलनी, शांतीनगर, नवनाथ नगर, लक्ष्मी नगर, नाटेश्वर अशा अगणित कॉलनी व वसाहतीतील नागरिकांना बाहेरगावी ये-जा करण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे धुळे बस स्थानक किंवा प्रकाश टॉकीज जवळील बस स्थानक आहे, या स्थानाकापर्यंत पोहोचण्यासाठी रिक्षा चालक बांधवांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जाते व नागरिकांचा व विद्यार्थ्यांचा वेळही वाया जातो.
सदर परिसरात श्रमिक व गरीब लोक आहेत सर्वांना रिक्षा भाड्याचा सारखा खर्च परवडणारे नाहीत.
म्हणून आझाद नगर शिवसेना वरील परिसरातील ज्येष्ठ नागरिक,महिला भगिनी, विद्यार्थी व सरकारी कर्मचारी तथा मार्केट यार्ड परिसर निवेदन दिले.
पारोळा रोड येथील नक्षत्र मंगल कार्यालय शेतकरी पुतळ्याजवळ एक बस थांबा मंजूर व्हावा जेणेकरून या भागातून अमळनेर,पारोळा,जळगाव व या मार्गाने येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल.
अशा 15 ते 17 कॉलनीसाठी या बस थांबण्याचा लाभ होईल
सदर रामचंद्र नगर जवळील शेतकरी पुतळा येथे आपण बस थांबा मंजूर केला तर वरील सर्व कॉलनीतील व परिसरातील नागरिकांची प्रवासाची मोठी सोय होईल सदर बस थांब्यावर येणारी व जाणारी प्रत्येक बस थांबेल याची सोय करावी.
*या परिसरातून मोठ्या प्रमाणावर नोकरवर्ग व व्यवसाय करणारे नागरिक असल्यामुळे त्यांना कामानिमित्त रोज या मार्गावरील गावखेडे व शहरांना बसने प्रवास करावा लागतो त्यांना या बस स्टॉप चा लाभ होईल व त्यांची गैरसोयी दूर होईल.
रामचंद्र नगर पारोळा रोड शेतकरी पुतळा जवळ बस थांबा मंजूर करावा अशा आशयाचे निवेदन शिवसेनेच्या वतीने धुळे जिल्हा विभागीय अधिकारी व धुळे आगार व्यवस्थापक यांना देण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे पंकज भारस्कर,विभागप्रमुख सागर निकम, बाळूभाऊ शेंडगे, संदीपदादा चौधरी, ज्योतीताई चौधरी, मनोजभाऊ शिंदे, हर्षलभाऊ वाणी, थोरात काका, एन.के.शिंदे, पाटील साहेब, व परिसरातील स्थानिक नागरिक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.