पुनंदगाव नागझरी नांदूर ग्रामस्थांनी एकत्र येऊन राबवला अविस्मरणीय उपक्रम
विद्यमान आमदार चुलत्या ,पुतण्यांची महापुरुषांच्या जयंतीला पाठ
पत्रकार परमेश्वर चांदने इंडियन टीव्ही न्यूज जिथे एक गाव एक जयंती उत्सव साजरा होत नाही तिथे पुनंदगाव येथील साहित्यरत्न डॉ.आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव कमिटीने जयंती उत्सवाच्या कार्यक्रमासाठी तीन गाव जोडून एक आदर्श निर्माण करून इतिहास घडवला आहे.
दि.२१ ऑगस्ट २०२५ रोजी हा सोहळा मोठ्या थाटामाटात पुनंदगाव येथे संपन्न झाला.
सकाळी १० वाजता भगवान कदम , कमलाकर कुरे ,राजेश मेंडके यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले .
दुपारी सरपंच रुद्रा कूरे यांनी मिरवणूकीचे उद्घाटन केले तर मोठ्या थाटामाटात मिरवणूक संपन्न झाली व अगदी उत्साहात तिनही गावात या मिरवणूकीचा रंग पाहायला मिळाला विशेष म्हणजे या तीनही गावासह परिसरातील सर्व मंडळींसाठी स्नेहभोजन या कमिटीने आयोजित केले होते.
नियोजित वेळेत याच भागातील राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय विविध पारितोषिक मिळवलेल्या संध्या अंकुश मुजमुले, समृद्धी सतिश काकडे,साक्षी संतोष शिंदे या बालकलाकारांनी आपल्या नृत्याने उपस्थितांचे मन जिंकली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नितीन दादा नाईकनवरे तर उद्घाटक म्हणून विजय भैय्या जगताप हे होते. प्रमुख पाहुणे लहुजी विद्रोही सेनेचे अध्यक्ष भास्कर शिंदे, महाराष्ट्र आधार सेनेचे अध्यक्ष तथा दैनिक महाराष्ट्र आरंभचे संपादक दिपक थोरात, अमोल शेरकर, अनिल राधे कांबळे, चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब घोडके, डॉ.यशवंतराजे भोसले, एडवोकेट अमोल डोंगरे,डॉ. पूजा केंद्रे , भिसे सर, परमेश्वर आडागळे, पत्रकार अमर साळवे, मच्छिंद्र उफाडे, परमेश्वर चांदने हे होते.
मान्यवरांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले
तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश काकडे यांनी केले आभार पत्रकार आनंत घडसिंगे यांनी मानले
मान्यवरांच्या भाषणाच्या कार्यक्रमानंतर कलर्स मराठी फेम शुभम मस्के यांचा बहारदार गीताचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आझाद क्रांती सेनेचे अध्यक्ष राजेश घोडे, संजीवनी हॉस्पिटलचे डॉ. गिलबिले ,डॉ.दिनकर मस्के ,डॉ अमोल परतुरकर ,डॉ.गणेश सुरवसे यांनी या कार्यक्रमास धावती भेट दिली.या कार्यक्रमास परिसरातील प्रेक्षणीय उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे आयोजन पुनंदगाव ,नागझरी ,नांदूर साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे जन्मोत्सव समितीने केले होते.
*चौकट*
*या भागाचे विद्यमान आमदार व त्यांचे पुतणे भावी आमदार हे केवळ निवडणुक काळात भेटी देतात. चार दोन बगलबच्चे हाताखाली धरतात.
साहित्य रत्न डॉ.अण्णाभाऊ साठे, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह कोणत्याच महापुरुषांच्या जयंती उत्सवात निमंत्रण देऊन ही या गावात आलेले नाहीत त्यांना फक्त या समाजाची निवडणुकीत मत पाहिजे आहेत*
*ग्रामस्थ पुनंदगाव, नागझरी ,नांदूर*