“तुमसर येथे जन सन्मान यात्रेच्या भव्य स्वागता करीता माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या उपस्थितित नियोजनात्मक बैठक संपन्न
(गोंदिया रिपोर्टर महेंद्र कनोजे)
( गोंदिया ) राज्याच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती तसेच ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा प्रचार प्रसार लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस जनसन्मान यात्रेच्या माध्यमातुन करीत असून या पार्श्वभूमीवर आगामी 01 सप्टेंबरला तुमसर – मोहाडी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची जन सन्मान यात्रा आयोजित करण्यात आली आहे. मातोश्री सभागृह, तुमसर जिल्हा भंडारा येथे जन सन्मान यात्रेचे भव्य स्वागत व कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार प्रफुलभाई पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
जन सन्मान यात्रेच्या अनुषंगाने 25 ऑगस्टला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, तुमसर येथे माजी आमदार राजेंद्र जैन व आमदार राजू कारेमोरे यांच्या उपस्थितीत नियोजनात्मक बैठक संपन्न झाली. जनसमान यात्रेचे भव्य स्वागत, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनजागृती व व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्या संबंधात सविस्तर चर्चा करण्यात आली.
माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार राजू कारेमोरे, अभिषेक कारेमोरे, देवचंद ठाकरे, धनेद्र तूरकर, सुभाष गायधने, योगेश सिंगजुडे, यासिन छवारे, प्रदीप भरणेकर, पमा ठाकूर, सरोज भुरे, नानू परमार, विजया चोपकर, जयश्री गाभने, नेहा मोटघरे, नंदा डोरले, आरती चकोले, मीना गाढवे, राजेश देशमुख, सुनिल थोटे, सुमित मलेवार, पवन चौहान, प्रमेश नलगोपुलवार, मनोज वासनिक, खेमू गाभने, आनंद मलेवार, महादेव पाचघरे, शैलेश साखरवाडे, अनिल साठवणे, नौशाद शेख, अविनाश पटले,