‘आई सेंटर प्रो’ ही विक्रमवीर घडविणारी संस्था – ऍड.राहुल बनसोडे
अंबाजोगाईत गुणवंतांचा सत्कार व करिअर विषयक मौलिक मार्गदर्शन
अंबाजोगाई (डी. के.जांभळे पाटील)
‘प्रत्येक व्यक्तीमध्ये एक विशिष्ट प्रतिभा असते. ती वेळेवर ओळखून योग्य मार्गदर्शनाच्या आधाराने विकसित केली, तर तीच प्रतिभा विक्रमांचे शिखर गाठते,’ असे स्पष्ट, प्रभावी आणि प्रेरणादायी विचार सुप्रसिद्ध विधिज्ञ व अभ्यासू वक्ते ऍड.राहुल बनसोडे (नाशिक) यांनी व्यक्त केले.
नालंदा फाऊंडेशन, बीड आणि आई फाऊंडेशन, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने अंबाजोगाई येथील आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात आयोजित गुणवंत सत्कार व करिअर मार्गदर्शन सोहळ्यात ऍड.बनसोडे हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, ‘स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी केवळ शैक्षणिक गुणवत्ता पुरेशी नसते, तर स्वतःवरील विश्वास, जिद्द, सातत्य आणि ध्येयासाठीची निष्ठा यांचे संयोजन आवश्यक असते. आपली चमक दुसऱ्यावर अवलंबून न ठेवता स्वतःच निर्माण करावी लागते.’ यावेळी ऍड.बनसोडे यांनी विधी क्षेत्रातील करिअरच्या संधींबाबतही सविस्तर मार्गदर्शन केले. कायदाशास्त्र हे केवळ वकिलीपुरते मर्यादित नसून, न्यायसंस्था, प्रशासन, मानवी हक्क, सल्लागार सेवा, आंतरराष्ट्रीय कायदा आणि संशोधन या क्षेत्रांतही मोठ्या प्रमाणात करिअरच्या संधी उपलब्ध आहेत, हे त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यक्रमात ‘द आयडियल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड’ अंतर्गत विक्रम नोंदविणाऱ्या गुणवंतांचा विशेष सत्कार करण्यात आला. याबाबत बोलताना ऍड.बनसोडे म्हणाले, ‘या रेकॉर्डधारकांनी त्यांच्या अंगभूत प्रतिभेच्या जोरावर हे शिखर गाठले आहे. ते हेच दाखवते की योग्य संधी, दिशादर्शक मार्गदर्शन आणि स्वतःचा आत्मविश्वास यांचे संमीलन झाल्यास प्रत्येक व्यक्ती विक्रमवीर बनू शकतो.’ ‘आई सेंटर प्रो’ ही संस्था केवळ शिक्षणाचे केंद्र नसून, विश्वविक्रमवीर तथा ऍमेझॉन बेस्ट सेलिंग लेखक सर नागेश जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांतील सुप्त क्षमता ओळखून त्यांच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडवून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर कीर्ती मिळवून देणारा एक जागतिक मंच आहे, असे गौरवोद्गार काढून आयोजक संस्थेच्या कार्याचे विशेष कौतुक केले. या प्रेरणादायी सोहळ्यात शिक्षणतज्ज्ञ प्रा.प्रदीप रोडे, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे, सर नागेश जोंधळे, प्रा.राम गायकवाड, राजेंद्र घोडके, जगन सरवदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘आई सेंटर प्रो – द डायनॅमिक कम्युनिकेटर’ आणि ‘आई सेंटर प्रो – चॅम्पियन’ या उपक्रमांतर्गत इंग्रजी भाषेवर विशेष प्रभुत्व असलेले सर नागेश जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ दिवसांत हमखास खात्रीने इंग्रजी बोलण्यासाठीचे आव्हान यशस्विरीत्या पूर्ण केलेले विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना सन्मानचिन्ह, ग्रंथ, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले व सोबतच दहावी-बारावी मध्ये यश मिळविलेल्या गुणवंतांचा भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.विकास वाघमारे यांनी केले. तर सुत्रसंचलन राहुल सुरवसे यांनी केले. उपस्थितांचे आभार डॉ.किर्तीराज लोणारे
‘आई सेंटर प्रो’ ही विक्रमवीर घडविणारी संस्था – ऍड.राहुल बनसोडे
अंबाजोगाईत गुणवंतांचा सत्कार व करिअर विषयक मौलिक मार्गदर्शन
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
‘प्रत्येक व्यक्तीमध्ये एक विशिष्ट प्रतिभा असते. ती वेळेवर ओळखून योग्य मार्गदर्शनाच्या आधाराने विकसित केली, तर तीच प्रतिभा विक्रमांचे शिखर गाठते,’ असे स्पष्ट, प्रभावी आणि प्रेरणादायी विचार सुप्रसिद्ध विधिज्ञ व अभ्यासू वक्ते ऍड.राहुल बनसोडे (नाशिक) यांनी व्यक्त केले.
नालंदा फाऊंडेशन, बीड आणि आई फाऊंडेशन, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने अंबाजोगाई येथील आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात आयोजित गुणवंत सत्कार व करिअर मार्गदर्शन सोहळ्यात ऍड.बनसोडे हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, ‘स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी केवळ शैक्षणिक गुणवत्ता पुरेशी नसते, तर स्वतःवरील विश्वास, जिद्द, सातत्य आणि ध्येयासाठीची निष्ठा यांचे संयोजन आवश्यक असते. आपली चमक दुसऱ्यावर अवलंबून न ठेवता स्वतःच निर्माण करावी लागते.’ यावेळी ऍड.बनसोडे यांनी विधी क्षेत्रातील करिअरच्या संधींबाबतही सविस्तर मार्गदर्शन केले. कायदाशास्त्र हे केवळ वकिलीपुरते मर्यादित नसून, न्यायसंस्था, प्रशासन, मानवी हक्क, सल्लागार सेवा, आंतरराष्ट्रीय कायदा आणि संशोधन या क्षेत्रांतही मोठ्या प्रमाणात करिअरच्या संधी उपलब्ध आहेत, हे त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यक्रमात ‘द आयडियल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड’ अंतर्गत विक्रम नोंदविणाऱ्या गुणवंतांचा विशेष सत्कार करण्यात आला.याबाबत बोलताना ऍड.बनसोडे म्हणाले, ‘या रेकॉर्डधारकांनी त्यांच्या अंगभूत प्रतिभेच्या जोरावर हे शिखर गाठले आहे. ते हेच दाखवते की योग्य संधी, दिशादर्शक मार्गदर्शन आणि स्वतःचा आत्मविश्वास यांचे संमीलन झाल्यास प्रत्येक व्यक्ती विक्रमवीर बनू शकतो.’ ‘आई सेंटर प्रो’ ही संस्था केवळ शिक्षणाचे केंद्र नसून, विश्वविक्रमवीर तथा ऍमेझॉन बेस्ट सेलिंग लेखक सर नागेश जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांतील सुप्त क्षमता ओळखून त्यांच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडवून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर कीर्ती मिळवून देणारा एक जागतिक मंच आहे, असे गौरवोद्गार काढून आयोजक संस्थेच्या कार्याचे विशेष कौतुक केले. या प्रेरणादायी सोहळ्यात शिक्षणतज्ज्ञ प्रा.प्रदीप रोडे, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे, सर नागेश जोंधळे, प्रा.राम गायकवाड, राजेंद्र घोडके, जगन सरवदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘आई सेंटर प्रो – द डायनॅमिक कम्युनिकेटर’ आणि ‘आई सेंटर प्रो – चॅम्पियन’ या उपक्रमांतर्गत इंग्रजी भाषेवर विशेष प्रभुत्व असलेले सर नागेश जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ दिवसांत हमखास खात्रीने इंग्रजी बोलण्यासाठीचे आव्हान यशस्विरीत्या पूर्ण केलेले विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना सन्मानचिन्ह, ग्रंथ, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले व सोबतच दहावी-बारावी मध्ये यश मिळविलेल्या गुणवंतांचा भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.विकास वाघमारे यांनी केले. तर सुत्रसंचलन राहुल सुरवसे यांनी केले. उपस्थितांचे आभार डॉ.किर्तीराज लोणारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नालंदा फाऊंडेशन, बीड आणि आई फाऊंडेशन, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने पुढाकार घेण्यात आला.