छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज आणि भोसले घराण्यावर गरळ ओकणाऱ्या आमदार संजय गायकवाड व मराठी माणसाला आपटून मारण्याची धमकी देणारा भाजपाचा खासदार निशिकांत दुबे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
शिवसेना चंद्रशेखर आझाद नगर विभाग व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रकाश टॉकीज जवळील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ दोघी नेत्यांना निषेध आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र आणि मराठी माणूस हा संत ज्ञानेश्वर,संत नामदेव,संत तुकाराम,श्री छत्रपती शिवाजी महाराज या संतांच्या, महात्म्यांच्या पुण्याईने आणि आशीर्वादाने हा महाराष्ट्र अत्यंत गुण्यागोविंदाने पुढे जात आहे परंतु सत्तेत बसलेले काही राजकीय पक्षाचे वादग्रस्त नेते हे गरड ओकत असतात.
तसेच आज बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी संपूर्ण भोसले परिवारावर अपमानास्पद वक्तव्य केले तसेच खासदार निशिकांत दुबे यांनीही महाराष्ट्रातील मराठी माणूस आमच्याकडे आला तर त्याला उपटून मारू अशा प्रकारची गरड ओकली त्याच निषेधार्थ धुळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने व मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जोरदार निषेध आंदोलन करत दोघे नेत्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे पंकज भारस्कर, सागर निकम, मनसेचे संतोषमामा मिस्तरी,बंटीबाबा सोनवणे, ज्योतीताई चौधरी, संदीपदादा चौधरी, मनोज शिंदे, ॲड.सागर जोशी, सागरसर साळवे,हर्षलभाऊ वाणी,पवन कुलकर्णी, इत्यादी पदाधिकारी व मराठी प्रेमी परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धुळे जिल्हा प्रतिनिधी जितेंद्र पाटील