आमदारांनीच पोलीस प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली
शिवसेना उबाठा वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
धुळे -धुळे शहरासह जिल्हाभरातील कायदा सुव्यवस्था व अवैध धंदे बाबत चिंता व्यक्त करावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण धुळे जिल्ह्यातील विद्यमान लोकप्रतिनिधी धुळे शहराचे विद्यमान आमदार अनुप अग्रवाल यांनी सध्या सुरू असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात धुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था प्रश्नां विषयी तारांकित प्रश्न उपस्थित करून सर्वोच्च सभागृहाला धुळे शहरातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्था प्रश्नी अवगत करून देताना धुळे शहरातील , ३० एप्रिल २०२५ मुस्लिम भागात वक्फ बोर्डाच्या आडून महावितरणच्या लाईनमध्ये हस्तक्षेप, संपूर्ण शहर अंधारात, त्याच अंधाराचा फायदा घेऊन हिंदू मंदिरांवर दगडफेक अजून आरोपी मोकाट, २१ मे २०२५ जिल्हा रुग्णालयात ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून हिंदू गोरगरीब नागरिकांचं धर्मांतर,आरोपींना केवळ नोटीस,२ जून २०२५ हिंदू व्यापाऱ्यावर हल्ला आरोपी जामिनावर बाहेर,१० जून २०२५ हिंदू कामगाराला मारहाण प्रकरण मिटवलं गेलं,२७ जून २०२५ तिरंगा चौकात एसटी चालक-वाहकांना हिंदू असल्याने मारहाण बसमधील प्रवाशांना उतरवलं, २७ जून २०२५ हिंदू तरुण वेदांत ओसवाल याला मारहाण जिवे मारण्याची धमकी ,४ जुलै २०२५ देवपूर परिसरात हिंदू तरुणाला मारहाण, दगडफेक दहशतीचं वातावरण,
मोहाडी परिसर पिण्याच्या पाण्यात थुंकणं, गोमांस पार्टी,आदी घटनांचा पाढाच वाचला, व ढिसाळ पोलीस प्रशासनाच्या कायदा सुव्यवस्था प्रश्न उपस्थित केले, तसेच साक्री तालुक्याच्या विद्यमान आमदार मंजुळाताई गावित यांनी देखील तारांकित प्रश्न आधारे साक्री तालुक्यात बनावट मद्य, ताडी, गुटखा, मटका, बेकायदेशीर धंदे सर्वत्र राजरोसपणे सुरु असल्याच सांगत बनावट ताडीचा अक्षरशः कहर सुरु आहे. परिणामी, तरुण पिढी व्यसनाधिन होत आहे. अवैधधंद्यांबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यास तक्रारदारालाच कोणत्या ना कोणत्या कारणाने अडकविले जाते. अवैधधंद्यांचे पुरावे व फोटो देवूनही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. दारुबंदीच्या ठरावांनाही पोलिसांचा प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे तक्रारदाराचे नाव गोपनिय ठेवतानाच अवैधधंद्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेत केली.
आ. गावितांनी पोलिसांच्या भुमिकेवर प्रश्न उपस्थित केले. त्या म्हणाल्या की, शाळेच्या कानाकोपऱ्यातही असे अवैधधंदे, बनावट ताडी, गुटखा विक्री सुरु आहे. ताडी विक्रेत्यांना कोणत्याही प्रकारचे भय राहिलेले नाही. पोलिसांना आम्ही पुरावे, फोटो, व्हीडीओ देत असतो. परंतु, कोणतीही कारवाई होत नाही. एखाद्या तक्रारदाराने फोटो, तक्रार करण्याचे धाडस दाखविल्यास त्या तक्रारदारालाच कोणत्या ना कोणत्या कारणाने अडकविले जाते. त्याचे नाव लगेचच बाहेर येते. आम्ही देखील जेव्हा माहिती देत असतो, तेव्हाही आमचे नाव लगेचच बाहेर व्हायरल होते आणि संबंधित यंत्रणेला माहिती दिली जाते. अर्थात अवैधधंद्यांना पोलिसांचेच अभय असल्याचे आ. गावित यांनी अधोरेखित केले. तक्रारदाराचे नाव गोपनिय ठेवा !
आ. गावित म्हणाल्या की, अवैधधंद्यांबाबत माहिती देणाऱ्याचे नाव गोपनिय ठेवण्यात यावे. तसेच महिला भगिनींनी गावागावात दारुबंदीचा ठराव केला आहे. दहा ते पंधरा गावांनी दारुबंदीचे ठराव संमत केले आहेत. परंतु, यंत्रणेकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे देखील त्यांनी सांगितले.
धुळे महानगरपालिका क्षेत्रात मागील सहा महिन्यात व वर्षभरापासून जातीय व धार्मिक तेढ निर्माण होणाऱ्या घटना व दंगल सदृश परिस्थिती निर्माण होत आहे, या घटनांची तीव्रता पाहता संबंधित प्रशासन का कायमस्वरूपी कायदेशीर उपाय योजना का टाळत आहे? धुळे शहरातील पोलीस प्रशासनाने महानगरपालिका क्षेत्रातील सर्व पोलीस स्टेशन यांना त्वरित आदेश देऊन दहा वाजेनंतर सर्व समसमान सर्व प्रकारचे व्यवसाय तात्काळ बंद करण्याचे आदेश प्रशासनाला द्यावे व धुळे महानगरपालिका , जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून वादग्रस्त ठरणारे स्पॉट व गुन्हेगारांवर त्वरित कारवाई करून अतिक्रमण मोकळे करावे, तसेच धुळे शहरात चालणारे अवैध सट्टा मटका , जुगार अड्डे , गुटखा ,नकली दारू , अंमली पदार्थांची विक्री , महाविद्यालयीन परिसरात चालणारे कॅफे बार या सर्व अवैध धंद्यांवर त्वरित कार्यवाही करणे गरजेचे आहे ,शहरात पोलिसाच्या व दारूबंदी खात्याने उघड्यावर सोडा गाडीवर दारु पिण्यास परवानगी दिली आहे का, हेही नागरिकांना जाहीर करावे. समाजविघातक मंडळी धुळे शहराची सतत कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा काम हे समाजकंटक करत आहे समाजकंटकांवर कोणत्याही प्रकारचा कायद्याचा धाक पोलीस प्रशासनाचा राहिला नाही आहे, विशिष्ट प्रकारच्या राजकीय संरक्षण प्राप्त गुन्हेगारांवर कोणत्याही प्रकारचे कारवाई धुळे जिल्हा प्रशासन करत नाहीत व सर्वसामान्य नागरिकांना कठोर कारवाई सामोरे जायला लागते .
यामुळे शहराच्या कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या सतत जातीय दंगली सदृश परिस्थिती निर्माण करून दहशतीखाली ठेवण्याचा प्रयत्न सतत सुरू आहे
धुळे शहराला गुन्हेगारांच्या दहशतीचा वापर करून येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणूक राजकीय सोय व अधिकाऱ्यांच्या संरक्षनाने जिंकण्याचे दृष्टिकोन आत्ताच दिसत आहे . याच्या अगोदरही शहराचे महत्त्वाचे ठिकाण असलेल्या पाचकंदील चौकात सुद्धा चार ते पाच घटना झाल्या आहे ,शहरात विविध ठिकाणी महिन्यातून दोन-चार घटना या जातीय किंवा धार्मिक वाद याला सतत राजकीय रंग देऊन धुळे शहराला दहशती खाली ठेवण्याचा काम धुळे शहरातील अधिकारी यांच्या सहकार्याने काही राजकीय मंडळी करत आहेत,
धुळे शहराला कायम दंगल सदृश्य परिस्थितीच्या दहशती खाली ठेवणाऱ्या या गुन्हेगारांवर जिल्हा प्रशासन कारवाई करणार का? असा प्रश्न आता जनता उपस्थित करत आहे.
वरील सर्व प्रश्नांवर पोलीस प्रशासनाने कायमस्वरूपी कायदेशीर उपाय योजना
लवकरात लवकर करावी त्यासाठी आपण देखील जातीने लक्ष घालून हे सर्व प्रकार थांबवावे ही नम्र विनंती, आगामी काळात हे प्रकरण थांबल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पोलीस प्रशासनाच्या विरोधात जन आंदोलन केले जाईल याची आपण नोंद घ्यावी , अशा आशयाचे शिवसेना उपनेते सौ. शुभांगी पाटील जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, मा.महापौर भगवान करणकाळ , उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, निंबा मराठे, महिला आघाडीच्या संगीता जोशी जयश्री वानखेडे, ज्योती चौधरी , युवा सेनेचे मनोज जाधव,अण्णा फुलपगारे, विवेक सुर्यवंशी,संदीप चौधरी, पंकज भारस्कर, कपिल लिंगायत, मनोज बंब, पिनू सूर्यवंशी, सागर निकम, विष्णू जावडेकर, अनिल शिरसाट, युवराज मराठे, हर्षल वाणी ,तेजस सपकाळ आदी उपस्थित होते.
धुळे रिपोर्टर जितेंद्र पाटील