अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने तहसील कार्यालयावर निदर्शने
पत्रकार परमेश्वर चांदणे इंडियन टीव्ही मराठवाडा चिफ ब्युरो
अखिल भारतीय किसान सभा माजलगाव समितीच्या वतीने आज तहसील कार्यालयावर निदर्शने करण्यात आले यावेळी, मंजरथ-गंगामसला मंडळ अतिवृष्टी मधून वगळले आहे ते मंडळ तात्काळ अतिवृष्टी मधून अनुदान वाटप करावे व शेतकऱ्यांचे होल्ड केलेले सेविंग खाते तात्काळ ते होल्ड काढावे, सरकारने सातत्याने घेतलेली शेती व शेतकरी विरोधी भूमिका यामुळे अडचणीत आलेला, कर्जबाजारी झालेला शेतकरी वैफल्यग्रस्त झाला असून दिवसेंदिवस आत्महत्येचे सत्र वाढत आहे. त्यातच यावर्षी सातत्याने लागून असणाऱ्या पावसाने ओल्या दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाल्याने शेतात पाणी साचून, पाणी लागून अथवा शेत वाहून जाऊन मोठ्या प्रमाणात पिकांची व शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत या परिस्थितीमुळे आणखीनच भर पडली असून त्यावर कडी म्हणून की काय, अमेरिकेच्या दबावाला बळी पडून केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क हटवून शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी वाढ केली आहे. अमेरिकन सरकार सातत्याने भारतावर दबाव वाढवून शेती क्षेत्रात सोयाबीन, कापूस, दूध इत्यादी उत्पादने इथे खपवून भारतीय शेती व त्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांचे रोजगार उध्वस्त करण्याचा डाव आखत आहे. तुर्तास अमेरिकेच्या यदाबापुढे भारताने कणखर भूमिका घेतल्याचे दिसून येत असले तरी कापसावरचे आयात शूल्क हटवून भारताने एकप्रकारे प्रतिसाद द्यायला सुरुवात केली आहे. सरकारकडून दबावाला बळी पडून कसलाही शेतकऱ्या विरोधातला निर्णय घेऊ नये म्हणून व या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांच्या खालील मागण्यासाठी दि. 03 सप्टेंबर 2025 रोजी तहसील कार्यालय माजलगाव येथे 11:30 AM वाजता निदर्शने केली आहेत. तरी शासनाने तात्काळ मागण्याची पूर्तता करावी अन्यथा यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देत आहोत, यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे तालुका अध्यक्ष कॉ.कृष्णा सोळंके, कार्याध्यक्ष कॉ. बाबा सर, कॉ.शिवाजी कुरे, कॉ. वसंत पाटील,कॉ. मोहन जाधव, कॉ. गणेश कदम, कॉ. सुदर्शन हिवरकर, कॉ.आबा राठोड, कॉ. रणवीर साखरे,प्रकाश सादोळकर,अरुण गरड, शरद नांदे, अनिल राठोड,सुरेश जाधव, विष्णू खेत्री,प्रभाकर खेत्री व शेतकरी सहभागी होते