शेतकरी मदतीपासून वंचित ठेवल्याने संताप.आदिवासी बहुल भागातील शेतकरी आंदोलनाची भूमिका घेतील, असा इशारा खरबी येथील सरपंच हेमंत नरवाडे यांनी दिला.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी ..विठ्ठल कदम शिवपुरीकर
दि.०३/०९/२०२५
हदगाव/तालुक्यातील सावरगाव (माळ)
ते पिंगळी तलाव ओढ्याच्या पुरामुळे केदारगुडा, खरबी, चोरंबा बु, चोरंबा खु., कुसळवाडी, तरोडा आदी गावांतील शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली. मात्र नुकसानीच्या यादीत या मंडळाचा समावेश नसल्याने शेतकऱ्यांत संभ्रम आणि संताप व्यक्त होत आहे.
तातडीने मदत मिळाली नाही तर आदिवासी बहुल भागातील शेतकरी आंदोलनाची भूमिका घेतील, असा इशारा खरबी येथील सरपंच हेमंत नरवाडे यांनी दिला आहे.