आज दिनांक १८/०९/२०२५ ला धानोरा तालुक्यातील पेंढरी येथे आर आर पाटील स्मार्ट गाव पुरस्कारासाठी पंचायत समिती धानोरा येथील तपासणी चमू नि ग्रामपंचायत ला भेट देवून विविध बाबींची तपासणी करण्यात आली.
यामध्ये श्री. अनिकेत पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.गडचिरोली, श्री. देव्हारे साहेब वि.अ.प., श्री. ठाकरे साहेब. कृषी विस्तार अधिकारी, श्री. बरई समन्वयक (स्वच्छता ) हे या चमू मध्ये होते.
यायामध्ये ग्रामपंचायत , जि.प शाळा. अंगणवाडी, सार्वजनिक शौचालय, घनकचरा व्यवस्थापन इ. ची तपासणी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत पेंढरी चे सरपंच पवन येरमे, श्री. श्रीनिवास दुल्लमवार मा. जि.प.सदस्य, मंजुषा पवार, लताबाई पावे, मंदाताई आतला, इ. ग्रा.पं. सदस्य, श्री. रवी जांभूळकर गट समन्वयक (पावस्व पंस धानोरा), रुनिता गुरनुले महिला बचत गट प्रतिनिधी व बहु संख्येने गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्री. सी.के.खुणे ग्रा.पं.अधिकारी यांनी केले तर प्रास्ताविक सरपंच पवन येरमे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यास ग्रा.पं.शिपाई श्री. अक्षय लेनगुरे , संगणक परिचालक श्री. कुंदन मोहुर्ले , व मोरेश्वर मोहुर्ले , आसावरी देवतळे यांनी अथक परिश्रम घेतले.