पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा कवलेवाडा तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया या भागात या इसम नामे राधेलाल रईस तांडेकर वय 30 वर्ष राहणार कवलेवाडा तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन गंगाझरी येथे अनेक प्रकारचे महाराष्ट्र दारूबंदी कायदे अंतर्गत गुन्हे दाखल असून वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती तरीसुद्धा नमूद इसम हा लपून छपून दारू विक्रीचा व्यवसाय करत होता त्याच्यावर मुसक्या आवडण्याकरता गंगाझरी पोलीस स्टेशन कडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 56 अ ब अन्वये कारवाई करण्यात आली असून प्रस्ताव मंजुरीस उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आले असून माननीय उपविभागीय अधिकारी यांनी राधेलाल रजिस्टर वय 30 वर्ष राहणार कवलेवाडा तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया यांना गोंदिया व भंडारा जिल्ह्यातून एक महिन्याकरिता हद्दपार करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब गोंदिया यांच्या आदेशान्वये माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी तिरोडा यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गंगाझरी सुधीर वर्मा, पोलीस अमलदार राकेश भुरे राजेश राऊत श्रीकांत नागपुरे व चित्रांजन सिंह जनेवार यांनी कारवाई केलेली आहे.
गोंदिया जिल्हा रिपोर्टर