बुलढाणा : रोहित शिंदे
बुलढाणा जिल्ह्यातील जानेफळ येथे एकता युथ फाउंडेशनच्या वतीने ईद-ए-मिलादच्या पावन पर्वानिमित्त महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हिदायत नगर, घुटी वेस, जानेफळ येथे झालेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिरात तब्बल ८९ जणांनी रक्तदान केले. लोकमान्य ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तसंकलन करण्यात आले. गरजू रुग्णांना आवश्यकतेच्या वेळी वेळेत रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचा आयोजकांच्या वतीने गौरव करण्यात आला. तसेच सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
ईद-ए-मिलादच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक करण्यात आले. रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत करण्याचा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी एकता युथ फाउंडेशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
