आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते डिजिटल वर्ग खोली चे लोकार्पण

आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते डिजिटल वर्ग खोली चे लोकार्पण.

वैशिष्ट पूर्ण योजनेतून 3 कोटी रुपयाचे कमाना मंजुरी.

तिरोडा -नगर परिषद मुख्याधिकारी राहुल परिहार यांच्या प्रयत्नाने तिरोडा गोरेगाव विधानसभा चे आमदार विजय रहांगडाले यांच्या पाठपुराव्याने वैशिष्ट पूर्ण योजनेतुन नगर परिषद छत्रपती दुबे प्राथमिक शाळेत 3 कोटी रुपयाचे कामे मंजूर करून घेतले, शाळेतील विध्यार्त्यांचे शिक्षण उच्च दरज्याचे मिळावे या साठी 3 वर्ग पूर्णतः डिजिटल कॅम्पुटर युक्त करण्यात आले,लिटिल बर्ड कॉन्व्हेंट इथे विज्ञान पार्क बांधकाम करने तसेच प्राथमिक शाळेत सोलर युक्त शाळा बनविणे या योजनेत आहेत. आमदार विजय रहांगडाले यांनी परिपूर्ण पणे तयार झालेल्या डिजिटल वर्ग खोलीचे लोकार्पण केले, या प्रसंगी तिरोडा चे उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, ठाणेदार अमित वानखेडे, माजी नगराध्यक्षा राखी गुनेरिया, सोनालीताई देशपांडे, माजी नगराध्यक्ष अजय गौर,डॉ. अविनाश जैस्वाल,माजी नगर सेवक राजेश गुनेरिया, अशोक असाठी, सुनील पालांदूरकर, विजय बनसोड, बाळू येरपुढे, प्रशांत डहाटे, उपस्तित होते.आलेल्या पाहुण्यांचे स्वागत मुख्याधिकारी राहुल परिहार यांनी केले. 8 वर्षा पूर्वी माजी नागराध्यक्ष अजय गौर आणि माजी नगर सेवक यांच्या प्रयत्नाने little bird कॉन्व्हेंट सुरु करण्यात आली, आज या शाळेत भरपूर विध्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांना चांगले आणि उच्च दरज्याचे शिक्षण मिळावे या साठी मुख्याधिकारी सदैव प्रयत्नशील असतात.

 

प्रवीण शेंडे
प्रतिनिधी गोंदिया.
मो. 9834486558.

Leave a Comment