वाशिम जिल्हा प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी कॉन्व्हेंटमध्ये आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत एक संस्मरणीय अनुभव दिला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली, ज्यामध्ये शाळेचे कार्यक्रमाचे अध्यक्ष देविदास म्हैसने , उद्घाटक शेषराव वसू, प्रमुख अतिथी ॲड मंगेश बुटे हाई कोर्ट नागपूर,शंकरराव गावंडे, नंकिशोर राणे सरपंच चोहोट्टा, शंकरराव घुगे ,दिलीप सुलताने, तसेच संचालक मंडळ श्रीमती ललिता ताडे अध्यक्ष,सौ.मीनाक्षी बुटे उपाध्यक्ष, सचिव मंगेश पुं.ताडे,प्रमोद देशमुख कोष्ध्याक्ष, जयश्री देशमुख संचालिका व शिक्षकवृंद आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी देशभक्ती, सामाजिक जाणीव, मैत्री आणि नातेसंबंध यावर आधारित विविध सांस्कृतिक सादरीकरणे सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. ‘शिवकन्या’ नृत्य सादरीकरणाने प्रेक्षकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आठवण करून दिली, तर ‘मुलगी वाचवा’ या भावस्पर्शी गीताने डोळ्यांत पाणी आणले. ‘जय हो’ आणि ‘माँ तुझे सलाम’ या देशभक्तिपर गीतांनी वातावरण भारावून टाकले, तर ‘मैत्री काय असते?’ या नाटिकेने मैत्रीचे खरे मूल्य अधोरेखित केले.
कार्यक्रमात पालकांची लक्षणीय उपस्थिती होती. आपल्या मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या पालकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.
“विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच आमचे उद्दिष्ट आहे. शैक्षणिक प्रगतीसोबतच सामाजिक जाणीवा निर्माण होणे गरजेचे आहे. अशा कार्यक्रमातून विद्यार्थी केवळ कला सादर करत नाहीत, तर समाजाला सकारात्मक संदेश देतात.”कार्यक्रमाच्या यशात शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे योगदान मोलाचे होते. शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला, तर पालकांनी त्यांना मंचावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहित केले. छत्रपती शिवाजी कॉन्व्हेंटच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रणालीचे कौतुक करत स्थानिक मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला दाद दिली.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा सांस्कृतिक उपक्रमांचे सातत्याने आयोजन गरजेचे आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक संतोष बचे, श्रद्धा खोटरे , प्रीती मोंडोकर ,राधा बुटे, वैष्णवी प्रांजळे , दिपाली वडाळ, राहाटे यांनी अथक परिश्रम घेतले.