
ब्युरो चीफ प्रताप नागरे
उमरखेड शहरामध्ये नगरपालिकेच्या समोर असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ शंभर फुटा पेक्षा जास्त उंचीचा राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी स्तंभ उभारण्यात आलेला आहे .ह्याच स्तंभावर 26 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रध्वज फडकविण्यात आला .तत्पूर्वी राष्ट्रध्वज खाली -वरी करण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले तेही संध्याकाळी !त्यामुळे काही नागरिकांना राष्ट्रध्वजाचा अपमान झाला अशी भावना निर्माण झाली असून त्यातून त्यांनी पोलीस स्टेशन उमरखेड येथे राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याची तक्रार नोंद केलेली आहे .काही जाणकार नागरिकाचे म्हणणे असे आहे की राष्ट्रध्वज हा प्रात्यक्षिक करण्याचे माध्यम नाही त्यासाठी आयोजकांनी तेवढ्या लांबीचा तेवढ्या रुंदीच्या तेवढ्या वजनाचे कापड घेऊन प्रात्यक्षिक करायला पाहिजे होते .पण असे न करता राष्ट्रध्वजालाच खाली -वरी करून ट्रायल घेण्यात आली .प्रत्येकांचे आपापले मते मतांतरे आहेत परंतु यातून मार्ग काढण्यासाठी पोलीस प्रशासनाने त्यांच्या जिल्ह्याच्या विधी तज्ञाकडे हे प्रकरण पाठवून हा गुन्हा होतो का याचा खुलासा मागितला ! विधीतज्ञाने एका गुप्तपत्राद्वारे हा गुन्हा होतो की नाही याचा चौकशी अहवाल संबंधित चौकशी अधिकाऱ्याला पाठवला .पण 14 जानेवारी 2025 रोजी राजस्थानी भवन उमरखेड येथे आगामी सण आणि उत्सवाचे निमित्त ठेवून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विद्यमान आमदार किसन वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीचे आयोजन झाले होते .या शांतता समितीच्या मीटिंग नंतर उमरखेड शहरातील भारतीय जनता पक्षाचे जिल्हा समन्वयक नितीनजी भुतडा यांनी एक पत्रकार परिषद बोलावली आणि त्या ठिकाणी अनेक विषयावर चर्चा झाली. त्यात त्यांनी ह्या राष्ट्रध्वज प्रकरणा संदर्भात चौकशी विधी तज्ञ यांनी पाठविलेल्या गुप्त पत्राच्या प्रती सार्वजनिक केल्या .उमरखेड येथील शिवसेना शिंदे गटाच्या उमरखेड शहर शाखेतर्फे ही गुप्त चौकशी अहवालाची प्रत सार्वजनिक कशी झाली त्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला तक्रार देण्यात आली असून संबंधित चौकशी अधिकाऱ्यासह इतर दोषीवर कारवाई करावयाची मागणी केलेली आहे . यावर जिल्हा पोलीस अधीक्षक काय कारवाई करतात याकडे परिसरातील सुज्ञ नागरिकांचे लक्ष लागले आहे