शिंदखेडा ( जितेंद्र पाटील प्रतिनिधी धुळे :-शिंदखेडा येथे
शहरातील व परिसरातील विविध रस्ता दुरुस्ती व निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करावी यासाठी शिंदखेडा तालुका(उबाठा) गटाचे पदाधिकारी व शिवसैनिक यांनी धुळे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिंदखेडा सार्वजनिक बांधकाम कार्यालयाच्या पायरीवर ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यानंतर उप अभियंता ए.बी. पवार यांना विविध रस्त्या संदर्भातील विषयांचे निवेदन देण्यात आले. सदर निवेदनाद्वारे शिंदखेडा शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे येथे तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती, न्यायालय, रुग्णालयात व शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची व शिंदखेडा तालुक्यातील सर्व गावांचे नागरीक, सर्व सामान्य शेतकऱ्यांनचे काहीना काही कामानिमित्त शहरात मोठ्या संख्येने येणे जाणे असल्यामुळे या शहरातील रस्ते त्यात राज्य मार्ग 12 बुराई नदीच्या पुलापासुन भगवा चौकाकडे येणारा रस्त्याचे काम बऱ्याच वर्षांपासून झालेले नाही. बुराई नदीच्या मोठ्या पुलाकडून, एसबिआय बँक, ग्रामीण रुग्णालय, दुतर्फी शापिंग, भाजी मार्केट, बसस्थानक, शिंदखेडा न्यायालय, किसान हायस्कूल व पंचायत समिती कार्यालय पर्यंत मोठ्या प्रमाणावर नागरीक, शेतकरी व विदयार्थीची वर्दळ असते याच रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत, बऱ्याच ठिकाणी लोखंडी सळई निघालेल्या आहेत तर कुठे धुळीचे साम्राज्य दिसत आहे. यात सर्व सामान्य शेतकरी, नागरीक व शालेय विद्यार्थीना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.तसेच वरपाडे रोड लगत झालेल्या निकृष्ट दर्जाचा रस्ता झाला असुन त्याची चौकशी होवुन संबंधित ठेकेदारावर कारवाई व्हावी असे वारंवार शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकारीनी तक्रार केली आहे.होळ ते गोराणेफाटा रस्ता दुरुस्त व्हावा.येणाऱ्या 10 दिवसात शिंदखेडा शहरातील मुख्य रस्त्याची दुरुस्ती साठी कार्यवाही केली नाही तर शिवसेना उबाठा गटाच्या वतीने तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल यातुन होणाऱ्या परीणामास संबंधित शासन, प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहणार असे सुचित केले. याप्रसंगी शिवसेना उबाठाचे धुळे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, ज्येष्ठ नेते सर्जेराव पाटील,माजी जि. प. सदस्य छोटू पाटील भाईदास पाटील, तालुकाप्रमुख गिरीश देसले, शहराध्यक्ष संतोष देसले, माजी शहराध्यक्ष नंदकिशोर पाटील, सागर देसले,दोडायचा शहराध्यक्ष शैलेश सोनार,कल्याण पाटील,ईश्वर पाटील, योगेश ईशी, एस. डी. पाटील, विष्णू चव्हाण, मुकेश कोळी, गौतम कोळी, यांसह बहुसंख्येने पदाधिकारी, शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.