ए. डी. फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने अविनाश काळू जाधव सन्मानित
अमळनेर येथील रहिवासी
शिरपूर (जि. धुळे) तालुक्यातील आर.सी. पटेल शाळेचे शिक्षक अविनाश काळू जाधव यांना महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त ए. डी. फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले.
विविध जिल्ह्यांमधून आलेल्या प्रस्तावांचे बारकाईने परीक्षण करून, शिक्षकांच्या कार्याचा अभ्यास, शिक्षणातील तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, सामाजिक कार्यात सहभाग तसेच विविध कलाकृतींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानज्योत प्रज्वलित करण्याच्या उपक्रमांचा विचार करून निवड समिती व संस्थेच्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला.
या भव्य सोहळ्यात इद्रिस नायकवडी (आ. विधान परिषद), विक्रमदादा सावंत (माजी आमदार जत), सांगली जिल्ह्याचे माजी महापौर नितीन सावगावे, संगीता खोत, संदीप सोसायटी कोकरे, प्रसिद्ध व्याख्यानकार सांगली आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यांच्या यशाबद्दल त्यांच्या परिवारांनी नातेवाईकांनी समस्त जाधव कुटुंबांनी आणि वसंत नगर गावातील रहिवासी यांनी त्यांचे कौतुक केले.