सुमारास नानासिंग साहेज्या पावरा वय 26 वर्षे रा. तेल्यामहु पो. कोडीद ता. शिरपूर जि. धुळे (मयत) याचा तेल्यामहु गावाच्या नाल्याजवळ अज्ञात इसमांनी धारधार चाकुने गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले होते. याबाबत मयताचा भाऊ लक्ष्मण सोहज्या पावरा यांनी फिर्याद दिले वरुन शिरपूर तालुका पोलीस ठाणे CCTNS गुरनं. 244/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्याचे ठिकाण हे कोडीद पासुन दोन किमी अंतरावर दुर्गम भागात असल्याने व गुन्हा रात्रीच्या वेळी निर्जन स्थळी घडला असल्याने गुन्हा उघडकीस आणुन आरोपीचा शोध घेणे अत्यंत कठीण होते.
मयत नानासिंग पावरा याचे मुकेश रुपसिंग पावरा रा. तेल्यामहु पो. कोडीद ता. शिरपूर जि. धुळे याच्या पत्नीशी अनैतीक संबंध असल्याची गोपनिय माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर मुकेश पावरा यास ताब्यात घेत मागील अनेक तासापासुन सखोल विचारपुस सुरु होती. परंतु मुकेश पावरा याने पोलीसांना कोणतेही सहकार्य न करता गुन्ह्याबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती, दरम्यान एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराच्या माहितीवरुन व मुकेश पावरा याचे सोबतचा गुन्ह्यात सहभागी असलेला आरोपी बागलसिंग नानुराम पावरा याला विचारपुस करुन त्यांचे उत्तरात तफावत येत असल्याने पुन्हा पुन्हा वेगवेगळे प्रश्न विचारुन दोन्ही आरोपी गोंधळल्याने त्यांनी संगनमताने खुन केल्याची कबुली दिली आहे. अशा प्रकारे सदरचा गुन्हा 24 तासात उघड करुन दोन्ही आरोपीतांना ताब्यात घेण्यात शिरपूर तालुका पोलीसांना यश आले आहे.
सदर कारवाई मा. श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक सो, धुळे, श्री. अजय देवरे अपर पोलीस अधीक्षक, धुळे, श्री. सुनिल गोसावी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर विभाग शिरपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोसई- मिलींद पवार, पोसई सुनिल वसावे, पोसई मनोज कचरे, पोहेकॉ/1289 संजय चव्हाण, पोहेकॉ/745 संदिप ठाकरे, पोहेकॉ/1081 रमेश माळी, पोहेकॉ / 11 राजु ढिसले, पोवा/1392 मोहन पाटील, पोकॉ/135 रणजित वळवी, पोकॉ/1677 योगेश मोरे, पोकॉ/1454 संजय भोई, पोकॉ/1727 सुनिल पवार, पोकॉ/1747 धनराज गोपाळ, पोकॉ/1562 स्वप्निल बांगर पोकॉ/922 विजय ढिवरे, पोकॉ/1464 कृष्णा पावरा अशांनी केली असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोसई मिलींद पवार हे करीत आहेत.