📍 निमगाव (ता. धानोरा) भेट
आ डॉ मिलिंद भाऊ नरोटे यांनी आज निमगाव ग्रामस्थांशी संवाद साधून गावातील विविध समस्यांची माहिती घेतली.
ग्रामस्थांनी रस्त्यांची व पांदण रस्त्यांची दुरुस्ती, बस सेवेसंबंधी अडचणी, वनपट्टा धारकांना, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन, शेतकरी कर्जबाजारीपणा, अपंग बांधवांसाठी इलेक्ट्रिक सायकलची गरज, ७/१२ नावे व पिण्याच्या पाण्याच्या समस्या अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.
तसेच सेमी इंग्लिश शिक्षण शाळेत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची स्थिती जाणून घेतली आणि शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या.
काही तातडीच्या समस्या फोनद्वारे संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून तत्काळ मार्गी लावल्या.
ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद देत समाधान व्यक्त केले.
भाजपा तालुकाध्यक्ष श्री. साजनजी गुंडावार, जिल्हा उपाध्यक्ष श्री अनिलजी पोहनकर, जिल्हा सचिव श्री. सारंगजी साळवे, माजी जि.प. सदस्य सिन्नूभाऊ दुल्लमवार, सरपंच सौ. छाया कुमारे, उपसरपंच श्री. चेतनजी सुरपाम, ता. महामंत्री श्री. शुभाषजी धाईत, श्री. शुभाषजी खोबरे, भाजयुमो तालुकाध्यक्ष श्री. सौरवजी सहारे, श्री. भूषणजी कुकुडकर व ग्रामस्थ सहकारी उपस्थित होते.