लोकमत व नवराष्ट्र ला दिनांक २४ डिसेंबर २०२५ ला पेंढरीत अस्वच्छतेचे वास्तव अशा प्रकारची खोटी बातमी प्रसिध्द करण्यात आली. काही समाजकंटक लोकांनी ग्रा.पं.च्या बदनामीकरिता काही वृत्तवाहीनीमध्ये ती बातमी दिली. महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाअंतर्गत पेंढरी ग्रामपंचायत उत्स्फुर्दपणे भाग घेवून अभियान यशस्वी करण्यास प्रयत्न करण्यात येत आहे. स्वच्छता, आरोग्य व मुलभुत सुविधा पुरविण्यात ग्रा.पं. कसोशिने प्रयत्न करीत आहे. गावामध्ये दररोज ई-रिक्षा द्वारे कचरा जमा करण्यात येते. नाली दरवर्षी नियमीत पणे साफ करण्यात येत आहे. सार्वजनिक शौचालय सुव्यवस्थीत असून आत्ताच मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शौचालयाची तपासणी केली होती. ग्रामपंचायत मध्ये खरेदी करण्यात आलेली साहित्य हे जेम पोर्टलद्वारे पारदर्शकपणे खरेदी करण्यात येतात. बंधारे, क्रिडांगण, परसबाग इ. कामे लोकसहभागातून करण्यात आली आहे. ग्रा.पं. कोणत्याही चौकशीस समोर जाण्यास तयार आहे. परंतु चौकशी करावयाची असेल तर खुशाल करा. पण चौकशी सर्व धानोरा तालुक्यातील ६१ ही ग्रामपंचायतीची झाली पाहीजे. हेतुपरस्पर फक्त ग्रामपंचायत पेंढरीचीच का ? ग्रा.पं. पेंढरी ही आदिवासी व दुर्गम भागात असून सुध्दा विकासकामात व अभियानात नेहमी पुढे आहे. यापुर्वी ग्रामपंचायतला संत गाडेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, आर.आर. पाटील स्मार्ट ग्राम पुरस्कार इ. पुरस्कार सुध्दा प्राप्त झालेले आहेत. लोकसहभागातुन वनराई बंधारे, परसबाग तयार करणे इ. कामे करण्यात आले आहेत. काही जळावू वृत्तीचे लोक नाहक ग्रामपंचायतीची बदनामी करत आहेत. याबाबत लवकरच पोलीस तक्रार करण्यात येत असून अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यात येणार आहे.
सरपंच ग्रामपंचायत पेंढरी