राष्ट्रीय क्रांती सेनेचा दिनांक 14 ऑक्टोबरला विभागीय कार्यालयावर धडक मोर्चा
पत्रकार परमेश्वर चांदणे मराठवाडा चिप ब्युरो
माजलगाव मतदार संघातील जनतेच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय क्रांती सेनेचे अध्यक्ष परमेश्वर मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 14 ऑक्टोबर रोजी माजलगाव उपविभागीय कार्यालय धडक मोर्चाचे आयोजन केलेले आहे
माजलगाव धारूर वडवणी या शहराना एक हजार कोटीचे पॅकेज देऊन या ठिकाणी मोठे औद्योगिक क्षेत्र निर्माण झाले पाहिजे
तसेच रामगिरी महाराज व नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावतील असे जे वक्तव्य केले होते त्यांना देखील अटक केली पाहिजे.
मुस्लिम समाजाला ओबीसी समाजाला लोकसभेमध्ये व विधानसभेमध्ये राजकीय आरक्षण देऊन एससी एसटीच्या धरतीवर जागा आरक्षित करण्यात याव्यात या मागण्यांसाठी माजलगाव उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी माजलगाव वडवणी धारूर येथील बंधू आणि भावांनो स्त्री पुरुष लहान मोठे सर्वांनी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय क्रांती सेनेचे अध्यक्ष परमेश्वर जी मुंडे यांनी केले आहे
खरं सांगायचं झालं तर परमेश्वर मुंडे हे लहान वयापासूनच त्यांना समाजाविषयी नव्हे तर येथील जे बेरोजगार आहेत जे कष्टकरी आहेत ऊसतोड मजूर आहेत या सर्वांना औद्योगिक क्षेत्रामध्ये नोकऱ्या कशा मिळतील यासाठी धडपडत आहेत तरी आपण सर्व साथ द्याल जेणेकरून ऊसतोड मजूर हे बाहेर राज्यात जाणार नाहीत आणि त्यांच्या हाताला या ठिकाणी काम उपलब्ध होईल यासाठी येणाऱ्या मोर्चामध्ये आपण सहभागी व्हाल असे आव्हान रवी देशमुख.श्रीराम मुंडे.दत्ता नागरगोजे. शेख खाजा इत्यादींनी केले आहे
