बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पुण्यातून तिघांना अटक; आतापर्यंत 14 जणांना पोलिसांनी पकडलं

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पुण्यातून तिघांना अटक; आतापर्यंत १४ जणांना पोलिसांनी पकडलं

मुंबई – बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात हरियाणातून अटक केलेल्या अमित कुमार पाठोपाठ पुण्यातून आणखी तिघांना बुधवारी अटक करण्यात आली आहे.

रुपेश राजेंद्र मोहोळ 22, शिवणे, करण राहुल साळवे 19,उत्तम नगर आणि शिवम अरविंद कोहाड 20, उत्तम नगर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. या प्रकरणात यांचा सहभाग समोर येताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. अटक आरोपींची संख्या 14 वर गेली आहे.

सिद्दीकी यांच्या हत्येपूर्वीही पुण्यातील वारजेत एका तरुणाने समाज माध्यमात मजकूर लिहिल्याचे आढळल्याने खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे, या संदेशात लॉरेन्स बिष्णोई, त्याचा भाऊ अमोल बिष्णोई यांच्या नावाने सिद्दीकी यांना धमकावण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी शिवाचा पुण्यात भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता, अशी माहिती तपासात मिळाली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने यापूर्वी बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित 10 आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली होती. रविवारी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी हत्या प्रकरणातील आरोपी भागवत सिंह (32) याला नवी मुंबईतील बेलापूर येथून अटक केली. तो मूळचा राजस्थानच्या उदयपूरचा आहे.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात पोलीस सातत्याने नवनवीन खुलासे करत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीत आता आणखी एक मोठी बाब समोर आली आहे. चौकशीदरम्यान पोलिसांना माहिती मिळाली आहे की, बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्याआधी शूटर्सनी कर्जत खोपोली रोडवरील जंगलात पिस्तुलाने गोळीबार करण्याचा सराव केला होता.

पुणे.महाराष्ट्र प्रकाश सोनवणे इंडियन टीव्ही न्यूज असोसिएट हेड महाराष्ट्र

Leave a Comment