गोंदिया –
भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच कामगार मोर्चा चे प्रदेश अध्यक्ष एड. विजय हरगुडे यांच्या निर्देशानुसार १ ते १५ जानेवारी पर्यंत संपूर्ण राज्यात भाजप सदस्यता नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत पुर्व विदर्भात १ लक्ष कामगारांना भाजप चे सदस्य म्हणून नोंदणी करण्याचा संकल्प कामगार मोर्चा भाजप चे विभाग अध्यक्ष धनंजय वैद्य यांनी केला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कामगार मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष एड. विजय हरगुडे आणि कामगार मोर्चा चे सदस्यता नोंदणी अभियान संयोजिका सौ भाग्यश्रीताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ५ जानेवारीला बुथ स्तरावर सदस्यता नोंदणी अभियान राबविण्यात आले. पुर्व विदर्भातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात कामगार मोर्चा चे पदाधिकारी यांनी बुथ लावून सदस्यता नोंदणी अभियान राबविले. या श्रृंखलेत गोंदिया विधानसभा अंतर्गत गांधी वार्ड, (ओल्ड गोंदिया) इथे बुथ लावून सदस्यता नोंदणी अभियान राबविण्यात आले. या मध्ये परिसरातील २८७ नागरिकांनी भाजप ची सदस्यता स्विकारली. आणि संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात ६७३ नागरिकांनी कामगार मोर्चा च्या बुथ स्टाल वर जाऊन भाजपची सदस्यता नोंदणी केली. विशेष म्हणजे या नोंदणी अभियानात फक्त कामगार मोर्चा ने स्टाल लावून नोंदणी करून घेतली.
या नोंदणी अभियानात कामगार मोर्चा चे धनंजय वैद्य, प्रदेश सचिव तथा अध्यक्ष पुर्व विदर्भ विभाग, उपाध्यक्ष अशोक चन्ने, जिल्हा महामंत्री गौरव थापा, जिल्हा महामंत्री सचिन शेंद्रे, जिल्हा महामंत्री विनोद ठाकुर, जिल्हा महामंत्री हिवराज मेश्राम, जिल्हा महामंत्री लक्ष्मीकांत हटवार, जिल्हा उपाध्यक्ष बबलु वासनिक, अंकुश वैद्य, गौतम गणवीर, महेश ठवरे, अ. जा. मोर्चाचे मिलींद बागडे, रमा वैद्य सह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रवीण शेंडे
ब्युरो चीफ
गोंदिया जिल्हा