राजुरा (ता.प्र) :– इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे १५ जानेवारी महान कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या जयंतीनिमित्त राज्य क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी १९५२ च्या हेलीसिंका ऑलिंम्पीक मध्ये कुस्तीच्या फ्रीस्टाईल बॅटमवेट ५७ किलो वजन प्रकारात कास्यपदक मिळवून देशाचे नाव उज्ज्वल केले. म्हणूनच महाराष्ट्र राज्यात १५ जानेवारी हा दिवस क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने क्रीडापटू खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच इन्फंट शाळेतील ज्या विद्यार्थ्यांनी शालेय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळवले त्यात बुद्धिबळ ,बॉल बॅडमिंटन, जुडो ,कराटे व्हॉलीबॉल, कबड्डी, लंगडी, खो-खो थ्रोबाल अशा सर्व खेळाडू विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व विद्यार्थ्यांना विविध खेळांसाठी प्रोत्साहन देण्यात आले.
या प्रसंगी मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौऱ भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, शाळेतील क्रीडा शिक्षक पुंडलिक वाघमारे, हर्षल क्षीरसागर, शुभम बंनेवार तसेच शाळेतील शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत सर यांनी केले व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.