१५ऑगस्ट आणि २६ जानेवारी संपूर्ण भारतात स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. परंतु डिसिल्वा कुटुंबाला दरवर्षी हे दोन दिवस उपोषणासाठी निवडावे लागतात.याचे काय कारण कोणी समजून घेऊ शकेल काय?
डिसिल्वा कुटुंब सालई वाडा,घर क्रमांक २२१एफ वार्ड येथे गेली ६५ वर्षे राहतात घरात त्यांची आई ९१ वर्षाची लकवाग्रस्त आहे. तिला वेळोवेळी स्ट्रेचरवरून ॲम्बुलन्स मध्ये न्यावे लागते . घराच्या बाजूला पिढ्यान-पिढ्या असलेली पानंद असून त्यावरून ॲम्बुलन्स येतजात नाही. नगरपालिकेने अर्धी पानंद बनवली सुद्धा आहे.ती जागा पोस्टानी घेतली असून तिथे पोस्टाचे बांधकाम सुरू आहे. सदर रस्ता पूर्ण करून नगरपालिका डीसील्वा कुटुंबाला देणार होते. परंतु जागा पोस्टाने घेतल्यामुळे रस्ता पोस्टाने करावा की नगरपालिकेने करावा या वादामध्ये तो रस्ता गेली अनेक वर्ष धूळ खात पडला आहे. सदर रस्ता पूर्ण व्हावा म्हणून१५ ऑगस्ट २०२३ रोजी पहिल्यांदा नगरपालिकेसमोर ते उपोषणाला बसले. त्यावेळी नगरपालिकेने सदर जागा पोस्टाने विकत घेतल्यामुळे तुमचा वहिवाटीचा रस्ता बंद झाला आहे,तरी तुम्ही पोस्टाकडून जागा मागून घ्या, आम्ही तुम्हाला रस्ता बनवून देतो अशी भूमिका घेतली.
त्यानंतर २६ जानेवारी २०२४ रोजी प्रांत ऑफिस समोर डिसिल्वा कुटुंब उपोषणाला बसले.प्रांत ऑफिसने सुद्धा तीच भूमिका घेतली.वास्तविक प्रांत ऑफिसने पोस्टाच्या अधिकाऱ्यांना बोलवून जुना वहिवाटीचा रस्ता सुरू ठेवणे अभिप्रेत होते.परंतु प्रांत ऑफिसने आपली जबाबदारी झटकली.
परिणाम स्वरूप रस्ता पूर्ण झाला नाही.
म्हणून पुन्हा १५ऑगस्ट २०२४ रोजी प्रांत ऑफिस समोर डिसिल्वा कुटुंब उपोषणाला बसले. अधिकार्यांची धावपळ झाली तारांबळ उडाली.
प्रांत ऑफिस ने तातडीने पोस्टाच्या अधिकाऱ्यांना नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतलें व त्वरीत जागेची पाहणी केली.प्रत्यक्ष जागेवर जाऊन मोजमाप घेऊन हात नकाशा बनवला व पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्यांना देऊन तुम्हाला रस्ता करून देतो असे आश्वासन दिले.परंतु नकाशा डीसीलवा कुटुंबाला दिलेला नाही किंवा प्रांत ऑफिसने त्यांनाही नकाशा दिला नाही. त्यामुळे रस्ता अजूनही पूर्ण झालेला नाही. नगरपालिका आणि पोस्ट ऑफिस यांच्या टोलवाटोलवीमुळे अजूनही रस्ता पूर्ण न झाल्यामुळे येत्या २६ जानेवारी २०२५ रोजी डिसिलवा कुटुंब पुन्हा उपोषणाला बसत आहे. ९१ वर्षाच्या आईच्या अंतिम इच्छा नुसार तिला तिच्या राहत्या घरात सावंतवाडी येथे राहायचे आहे.परंतु पोस्ट ऑफिस व नगरपालिका यांच्या मनमानी कारभारामुळे रस्ता पूर्ण होऊ शकत नाही. पर्यायाने ॲम्बुलन्स त्यांच्या घरापर्यंत पोहोचू शकत नाही व त्यांची तज्ञ आई आपल्या ९१ व्या वर्षी स्वतःच्या घरात राहू शकत नाही. सदर रस्त्याचा उपयोग पोस्टाला सुद्धा होणार आहे.पोस्टाने सुद्धा याची नोंद घेऊन रस्ता पूर्ण करणे गरजेचे आहे. तरी या गोष्टीला सर्व पत्रकारांनी वाचा फोडावी व डीसील्वा कुटुंबाला मदत करावी. जेणेकरून २६जानेवारी २०२५ रोजी डिसिल्वा कुटुंब या उपोषणाला बसत आहेत त्या उपोषणाला प्रसिद्धी द्यावी. डिसिल्वा बंधू सेंटर रेल्वे मध्ये मेल लोको पायलट होते.त्यांनी कोकण रेल्वेच्या सर्व गाड्या मुंबई ते रत्नागिरी पर्यंत चालवल्या आहेत. आत्ता ते तीन महिन्यापूर्वीच यशस्वी रित्या विना अपघात गाडी चालवून वंदे भारत या गाडीवर सेवा निवृत्त झाले आहेत. आता तेही उपोषणाला बसत आहेत. त्यांच्या या कामगिरीची जाणीव ठेवून हे पत्र प्रसिद्ध करावे हि नम्र विनंती.
आपला प्रसिद्धी प्रमुख
प्रकाश बळीराम सोनवणे
असोसिएट हेड महाराष्ट्र