इंडियन टीवी न्यूज से ब्युरो चीफ प्रताप नागरे वाशिम जिल्हा
लिंक चाचणी करणाऱ्या सोनोग्राफी सेंटरचा पर्दाफाश
वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरातील राठोड मॅटर्निटी अँड जनरल हॉस्पिटलमध्ये लिंग निदान होत असल्याच्या माहितीवरून आरोग्य विभागाने मोठी कारवाई केली गुप्त माहितीच्या आधारे वाशिम कारंजा आणि अकोला आरोग्य विभागाच्या पथकाने रुग्णालयावर 12 फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता छापा टाकला या छाप्यात रुग्णालयात पाच गर्भवती महिलां गर्भलिंग निदानाच्या प्रतीक्षेत असल्याचे आढळून आले या महिला पैकी दोन महिला बुलढाणा जिल्ह्यातील दोन अकोला जिल्ह्यातील एक महिला वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुका येथील होती आरोग्य विभागाला लिंग निदान होत असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर सहा सदस्यांचे पथक तयार करण्यात आले या पथकाने सापळा रचून एका गर्भवती महिलेला बनावट रुग्ण
म्हणून रुग्णालयात पाठवले
तेथे तिची भेट एका एजंट सी झाली ज्यांनी तिला लिंग निदानाची हमी देत 20000 रुपयाची मागणी केली त्या महिलेकडून मिळालेल्या माहितीनंतर आरोग्य विभागाने तात्काळ छापेमारी केली छाप्या दरम्यान पथकाने सोनोग्राफी मशीन सील केली आणि एजंट कडून 70 हजार पाचशे रुपये रोख रक्कम तसेच मोबाईल जप्त केले सोनोग्राफी मशीन द्वारे बाळाचे लिंग निश्चित करण्यासाठी आणि ते उघड करण्यासाठी फ्री कन्सेप्टन फ्री नेटल डायग्रोस्टिक टेक्निक पीसी पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत स्थापन केलेल्या जिल्हा आरोग्य विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे ,अकोला व वाशिम जमुमधील डॉ. विजया पवनीकर, डॉ. धनंजय चिमणकर, डॉ, एन आर साळुंखे डॉ. एस एम जाधव, डॉ. शुभांगी ठाकरे डॉ.राधा नरवलिया, ओम राऊत यांच्या पथकाने राठोड मॅटर्निटी अँड जनरल हॉस्पिटलच्या डॉक्टर रंजनी राठोड एजंट माधव ठाकरे आणि चालक संदीप नवघरे यांचे विरुद्ध पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत कारवाई केली, गर्भलिंग चाचणीचा पडदा पास करणारे शिलेदार सदरील कारवाई. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, पोलीस अधीक्षक अनुज तारे ,मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे ,उपसंचालक अकोला डॉक्टर भंडारी, आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अनिल कावरखे यांचे मार्गदर्शनात ही मोठी कारवाई करण्यात आली प्रसूती पूर्व निदान तंत्राचा वापर करून बेकायदेशीर रित्या गर्भलिंग, निदान करणे गर्भपात करणे, शिक्षेस पात्र आहे. परंतु त्यानंतर लपून-छपून गर्भलिंग निदान आणि गर्भपात करण्यात येत आहे यावर आळा घालण्यासाठी बेकायदेशीर गर्भलिंग निधानाची माहिती देणाऱ्यास 1 लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने टोल फ्री क्रमांक 18002334475104. जारी केला आहे संबंधित डॉक्टर किंवा त्या रुग्णालयाची तक्रार करण्याचे आव्हान आम्ही करीत आहोत.