इंडियन टीवी न्यूज ब्युरो चीफ प्रताप नागरे वाशिम
विभागिय प्रसिध्दी प्रमुख पदी ना.तहसिलदार श्री.रविंद्र राठोड यांची नियुक्ती
वाशिम:-दि. 8 मार्च रोजी यवतमाळ येथे महाराष्ट्र राज्य तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेचे अमरावती विभागीय अधिवेशन पार पाडले. या अधिवेशनात अमरावती विभागाची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली असून या कार्यकारणी मध्ये अमरावती विभागीय अध्यक्ष म्हणून वाशिम जिल्ह्याचे कारंजाचे तहसीलदार श्री कुणाल झालटे यांची एकमताने निवड झाली असून विभागीय प्रसिद्धी प्रमुख म्हणून मंगरूळपीर चे निवासी नायब तहसीलदार श्री रवींद्र राठोड यांची निवड करण्यात आली तसेच वाशिम जिल्ह्यातील वाशिमचे नायब तहसीलदार प्रतिभा चौधरी यांची महिला प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे.