
काँग्रेसची विचारधारा ज्यांनी आयुष्य भर जपली ते ज्येष्ठ नेते स्व. विलासराव पाटील उंडाळकर यांचे पुत्र ॲड. उदयसिंह पाटील दादा काँग्रेसला रामराम ठोकून मा.अजित
दादा पवार यांच्या राष्ट्रवादीत काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यानुसार मुंबईत सह्याद्री गेस्ट हाऊसवर ना.मकरंद पाटील आबा
यांच्या साक्षीने मा.अजित दादा व उदयसिंह पाटील यांच्यात खलबते झाली.जास्त चर्चा कराड दक्षिण मतदार संघात चालु आहे.या वृत्तास
उदयसिंह पाटील यांच्याशी चर्चा केली असता या वृतास दुजोरा दिला नाही. पण स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून या चर्चेला दुजोरा दिला आहे.स्व.यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त मा.अजित दादा आज कराड दौऱ्यावर येणार आहेत. ते कोयना बँकेस भेटही देणार आहेत.या प्रसंगी ना.मकरंद पाटील आबा व खा.नितीन पाटील हे ही या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. दरम्यान लोकसभा विधानसभेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्यासोबत प्रचाराची धुरा सांभाळणारे उदयसिंह पाटील हे पृथ्वीराज चव्हाण यांची साथ सोडुन राष्ट्रवादीत काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याने कराड दक्षिणच्या राजकारणाला नवीन कलाटणी मिळवुन नविन दिशा उदयास येणार आहे.