
गुरुवार, १० एप्रिल २०२५ रोजी
तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या २६२४ व्या जन्मकल्याणक महोत्सव निमित्त श्री जैन सामुदायिक उत्सव समिती (सकल जैन संघ पुणे चा उपक्रम) चे अध्यक्ष अचलभाई जैन, व सचीव अनिलकाका गेलड़ा यांच्या मार्गदर्शनखाली रॅली संयोजक आनंद दर्शन युवा मंच, पुणे ADYM यांच्या वतीने संदीप भंडारी व महेंद्र सुंदेचा मुथ्था यांच्या नेतृत्वात *अहिंसा टु व्हीलर रॅलीचे* भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते.
आमदार हेमंत रासने, कॉंग्रेस नेते अभयजी छाजेड, अरविंद शिंदे, विजयजी भंडारी, सामुदायिक उत्सव समितीचे अध्यक्ष अचलजी जैन, विजयकांतजी कोठारी, अनिल गेलड़ा सर, महावीर कटारिया, पोपटलालजी ओस्तवाल, आनंद दरबार चे अध्यक्ष बाळासाहेब धोका, इंदरकुमार छाजेड़, प्रवीण चोरबोले, रविंद्र दुगड, मनोज छाजेड, कीर्तिराज दुगड़, ललित शिंगवी, लक्ष्मीकांत खाबिया, दिलीप कटारिया, कविताताई वैरागे, राजश्री शिळीमकर, भाजपा जैन प्रकोष्ठ प्रदेशअध्यक्ष संदीपदादा भंडारी यांच्या प्रमुख उपस्थितीत जैन झेंडा दाखवून अहिंसा भवन, दादावाडी जैन मंदिर येथून दुपारी ०४.०० वाजता ३००० पेक्षा जास्त टू व्हीलर सह रॅलीचा शुभारंभ झाला. रॅली काढण्याचा उद्देश *जिओ और जिने दो* या तत्वावर व अहिंसेचा संदेश घरोघरी पोहोचवण्याचा होता.
जय महावीर च्या घोषणाने संपूर्ण पुण्यनगरी दुमदुमली.
रॅली पुण्याच्या दादावाड़ी सारसबाग येथून टिळक रोड स्वारगेट चौक, सेवन लव्ज़ चौक मार्गे मुकुंदनगर, महर्षिनगर, मार्केटयार्ड रोड, बिबवेवाडी, सातारा रोड, के.के मार्केट, महेश सोसायटी चौक, केंजळे कॉर्नर, गंगाधाम येथून नाजुश्री हॉल येथे समारोप करण्यात आला.
गौतमप्रसादीचा लाभ लखीचंदजी अभिषेकजी खिंवसरा या परिवारने घेतला होता.
ह्या रॅलीमध्ये पाच हजार पेक्षा जैन युवा युतीने सहभाग घेतला ज्यात महिलांची संख्या लक्षणीय होती.
भव्य दिव्य रॅली यशस्वी करण्यासाठी संदीप भंडारी व आनंद दर्शन युवा मंच पुणे चे अध्यक्ष महेंद्र सुंदेचा मुथ्था तसेच ए डी वाय एम च्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम केले.