मुंबई: जैन समाजाच्या आर्थिक व सामाजिक सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलताना जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या मुंबई कार्यालयाचे भव्य उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले.
सभेला संबोधित करताना मंत्री श्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, जैन समाजाच्या विकास व उत्थानासाठी महायुती सरकार पूर्वीही कटिबद्ध होती, सध्या देखील सज्ज आहे आणि भविष्यातही सदैव समर्पित राहील. महामंडळाच्या सुयोग्य व प्रभावी संचालनासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी एक कुटुंब प्रमुख म्हणून पूर्ण सहकार्य करणे मी माझे सौभाग्य आणि गौरव मानतो.
या गौरवशाली कार्यक्रमात महामंडळाचे अध्यक्ष श्री ललित गांधी यांनी आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने कार्यक्रमास विशेष महत्त्व प्राप्त करून दिले. अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी आतापर्यंत केलेल्या कार्यांचा सविस्तर आढावा सभेमध्ये मांडला. गेल्या १५० दिवसांमध्ये त्यांनी २६ जिल्ह्यांचा दौरा करत २२ जिल्हा कार्यालयांचे उद्घाटन केले आहे. या दौऱ्यांदरम्यान जैन समाजासाठी महामंडळाच्या विविध योजनांच्या प्रसार व प्रचारासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले, याची माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली.
या कार्यक्रमास राष्ट्रीय अल्पसंख्याक आर्थिक महामंडळ, भारत सरकारच्या अध्यक्षा आभा राणी सिंह यांची विशेष उपस्थिती लाभली, ज्यामुळे या समारंभाला अधिक गौरव प्राप्त झाला. महामंडळासाठी केंद्राच्या माध्यमातून पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. उपस्थितांचे स्वागत महामंडळाचे उपाध्यक्ष मीतेश नहाटा यांनी केले.
सरकारच्या विविध महामंडळांमध्ये जैन महामंडळाची स्वतंत्र व विशेष ओळख निर्माण करणे तसेच समाजामध्ये विविध सरकारी योजनांची जनजागृती निर्माण करणे, हा एक सातत्यपूर्ण व यशस्वी प्रयत्न ललित गांधी करत आहेत, अशी माहिती महामंडळाचे समन्वयक संदीप भंडारी यांनी दिली. त्यांनी असेही नमूद केले की, ललित गांधी यांच्या सक्रियतेमुळे आणि दूरदृष्टीमुळे जैन समाजाची सहभागिता शासकीय योजना व मंचांवर लक्षणीय स्वरूपात वाढली