पुरग्रस्तनच्या न्याय हक्कांसाठी नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष फारुक अहमद यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नांदेड/ विठ्ठल कदम शिवपुरीकर
नांदेड कलेक्टर ऑफिस समोर दि.१५/०९/२०२५ रोजी सुरू झालेल्या पुरग्रस्तनच्या न्याय हक्कांसाठी नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष फारुक अहमद यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख मागण्या :
1) नांदेड येथील 2024च्या पुरग्रस्तांचे पैसे तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करा व चालु वर्ष 2025 अतिवृष्टीच्या पुरग्रस्तांचे सर्वेक्षण घर निहाय ऐवजी कुटुंब निहाय किंवा घरकुलं निहाय करण्यात यावे व प्रत्येक कुटुंबाला पन्नास हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी.
2) नांदेड जिल्ह्यात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाल्याने कोल्हापूरच्या धर्तीवर नांदेड जिल्हा दुष्काळ ग्रस्त घोषित करुन विशेष पॅकेज घोषित करा व शेतजमीन शेती करण्याच्या उपयोगाची राहीली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना एक्करी एक लाख रुपये तात्काळ मदत द्यावी व नंतर पीक व इतर नुक्सानांची रितसर नुकसानभरपाई द्यावी
3) अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील गाव-तांड्यातील पुरग्रस्तांना पन्नास हजार प्रत्येक कुटुंबाला तात्काळ मदत करा व अश्या गावांचे पुनर्वसन करा, पशुपालक व दुग्ध व्यवसायीकांच्या ज्या पशुधनाचा नुक्सान झालं आहे त्या सगळ्या जनावरांच्या बाजार भावा प्रमाणे पुर्ण रक्कम देण्यात यावी.वरील मागण्या साठी वंचित बहुजन आघाडीचे
प्रदेश उपाध्यक्ष फारुख अहमद यांनी कलेक्टर ऑफिस समोर आमर उपोषणाला काल पासून सुरुवात केली तरी नांदेड जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व दुष्काळ ग्रस्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते