आज दि. 8/10/25 रोजी शिरपूर येथे शिवसेना
VID_20251008_212733_370.mp4 VID_20251008_212732_049.mp4
(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे शेतकरी हितासाठी हंबरडा आंदोलन व विविध मागण्या करीता धरने आंदोलन करण्यात आले, या आंदोलनात शिरपूर तालुक्यात वादळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्या पिकांची पिक विमा रक्कम प्रलंबित असून ती त्वरीत शेतकऱ्यांना मिळावी, शेतकरी सहाय्यता म्हणून शेतकरयांना हेक्टरी ₹.५००००/- थेट आर्थिक मदत जाहीर करावी, कापसाला हमीभाव ₹.१२०००/- जाहीर करावा, शेतशिवार रस्ते डांबरीकरण करण्यात यावे, अशा प्रमुख मागण्यांसह इतर मागण्या करीता धरने आंदोलन करण्यात आले होते, यावेळी भरत राजपूत, युवराज पाटील, राजु टेलर,योगेश सुर्यवंशी, विभा जोगराना, अभय भदाणे, पिंटू शिंदे, मुकेश शेवाळे, शरद पाटील, जितेंद्र पाटील, वाजीद मलक, बब्बलु शेख,संदीप धनगर, असे सर्व शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.