जिल्ह्यातील वन हक्क धारकांचे फार्मरआयडी तयार होत नसल्याने अनेक शेतकरी विविध योजना पासून वंचित आहेत.
२) वन हक्क धारकांचे तसेच मालकी हक्कधारकांनी धान विक्री करून प्रोत्साहन भत्ता न मिळाल्याबाबत, जिल्हाधिकाऱ्यांना व आमदारांना निवेदन देऊन चर्चा केले..
शासनाच्या नियमानुसार प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर आयडी तयार करणे सक्तीचे केल्यामुळे फार्मर आयडी शिवाय कोणताही शासकीय योजनेचे लाभ घेता येत नाही. परंतु आजचा परिस्थितीमध्ये वन हक्क पट्टेदारकांची आयडी तयार होत नसल्याने गोरगरीब शेतकरी आदिवासी बांधव आज ही शासनाच्या कल्याणकारी योजनेपासून वंचित आहेत.
परंतु काही शेतकऱ्यांची फार्मर आयडी बनवून सुद्धा शासन अप्रोल मंजुरी देत नाही आहे व काही वनपट्टे धारकांचे ७/१२ मध्ये नाव नोंदणी नाही . त्यामुळे सदर फार्मर आयडी तयार करण्यासाठी आपण शासन स्तरावरून पाठपुरावा करावे व वनपट्टेधारकांना न्याय देण्यात यावे त्याचप्रमाणे शासनाने दोन हेक्टर पर्यंत मर्यादित धान खरेदी केंद्रावर सरसकट हेक्टरी 20,000 रुपये प्रोत्साहन म्हणून जाहीर केले.
त्यातही बहुतांश शेतकऱ्यांना मदत पण मिळाले. परंतु वनपट्टेदारक व मालकी हक्क धारकांना अजून पर्यंत दुसरे पीक निघण्यास सुरुवात झाली.
तरीही शेतकऱ्यांचा खात्यात सदर रक्कम जमा झालेला नाही.
त्यामुळे आजचा परिस्थिती पाहता शेतकरी कोणत्या अडचणीचा सामना करीत आहेत हे आपण व शासन स्तरावर सुद्धा माहीत असून याकडे सातत्य दुर्लक्ष होत आहे .
सन 2023 24 यावर्षी शासनाचा नियमावलीप्रमाणे एक रुपयात पिक विमा अनेक शेतकरी काढले होते गडचिरोली जिल्ह्यातील एकही शेतकरीला पिक विमा चा लाभ मिळालेला नाही, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ लाभ देण्यात यावा, असे माननीय श्री अविशांत पांडा जिल्हाधिकारी तसेच आमदार डॉक्टर मिलिंद जी नरोटे यांना समस्या सांगून निवेदन दिले. यावेळी उपस्थित शेतकरी राजू लकडा कनेली,अनिल खलको, दलू कुमोठी,रतन एक्का , लालू टेकाम बोटेहूर, यांनी उपस्थित होते..💐👏💐🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀