बार्शी
तालुक्यातील हत्तीज येथील मूळ रहिवासी तथा सध्या नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील चौगाव जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकासह त्यांच्या कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. प्राथमिक तपासात आर्थिक तणाव आणि शेअर बाजारातील मोठ्या 1 कोटी 80 लाख लॉस नुकसानीमुळे ही घटना घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मृतांमध्ये योगेश बाळासाहेब पाटील (४१), पत्नी माधुरी पाटील (३७) तसेच त्यांचे दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त पाटील कुटुंब मूळ गावी हत्तीज येथे आले होते. शुक्रवारी सकाळी घरातून प्रतिसाद मिळत नसल्याने संशय निर्माण झाला आणि त्यानंतर ही घटना उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घटना स्थळी दाखल झाले व पुढील तपास चालू आहे.
रिपोर्टींग by krishna ingole