गंगापूर तालुक्यांसह जिल्ह्यातील जि. प. शाळेतील विद्यार्थी गणवेशापासून वंचित
लोकेशन
गंगापूर, औरंगाबाद छत्रपती संभाजी नगर
छत्रपती संभाजीनगर व तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना ७० दिवस होऊनही अद्याप पर्यंत गणवेश वाटप करण्यात आले नसल्याने हे गणवेश त्वरित वाटप करण्यात यावे नसता लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ तसेच बूट व पायमोजे देण्याबाबतचा शासन निर्णय क्रमांकः एसएसए १२१४ / प्र.क्र.५० एस.डी.३ दिनांक ०६ जुलै २०२३ नुसार निर्णय झालेला आहे व सबंधित विषयी राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळालेले आहेत. परंतु छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १५ जुन पासून शैक्षणिक सत्र २०२४-२५ सुरु होऊन ७० ते ७५ दिवस होऊन गेले तरीही आपल्या गंगापूर तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद शाळेतील गोर-गरिबांच्या विद्यार्थ्यांना अद्याप पर्यंत गणवेश मिळालेला नसल्यामुळे विद्यार्थी मागील वर्षीचाच जीर्ण झालेला गणवेश घालून शाळेमध्ये घालून येत आहे, परिणामी ग्रामीण भाषेत गणवश अभावी जिल्हा परिषद शाळांची इज्जत वेशीवर टांगलेली आहे काय ? भारताचे उज्ज्वल भविष्य घडविणाऱ्या विद्यार्थ्यांना शासन-प्रशासन गणवेश देऊ शकत नसेल तर गुणवत्ता कशी देत असेल ? असा प्रश्न ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे, विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा आपल्या स्तरावरून पाठपुरावा करून त्वरित विद्यार्थ्यांना देण्यात यावे अशी मागणी पालकांनी केली आहे. गटशिक्षणाधिकारी समाधान आराक यांना या प्रकरणी फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही.
छत्रपती संभाजी नगर जिल्हा प्रतिनिधी
सुनील झिंजुर्डे पाटील