भारतीय विद्यालय एकोडी ने मैदानी स्पर्धेत मारली बाजी*. (गोंदिया,महेंद्र कनोजे रिपोर्टर)
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदिया अंतर्गत दि.1 ऑक्टोंबर 2024 ला घेण्यात आलेल्या गोंदिया तालुकास्तरीय मुलींच्या मैदानी स्पर्धेत जिल्हा परिषद भारतीय विद्यालय एकोडी ने मारली बाजी.
U-14 वयोगटात रोशनी अंगलाल खजरीया 100 मी. प्रथम, धानी प्रकाश वरखडे 400 मी. प्रथम, U-19 वयोगटात सानिया उमेश बिसेन उंच उडी प्रथम. विजयी खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय क्रीडा प्रशिक्षक श्री टी. एस. गावडकर सर, जामुवंत भाऊ हरिणखेडे सर तसेच शाळेचे प्राचार्य श्री कवाणे सर व आपल्या आई-वडिलांना दिले. त्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.