माजलगाव येथे सोमनाथ सूर्यवंशी यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी अभिवादन
पत्रकार परमेश्वर चांदणे इंडियन टीव्ही
परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये संविधानाची प्रती कृतीची तोडफोड करण्यात आली होती त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटले काही ठिकाणी दगडफेक विविध मोर्चे अनेक आंदोलने उभारले गेली या आंदोलनामध्ये परभणी येथील आंदोलन सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून अनेक निरावरात भीमसैनिकांचे कोंबिंग ऑपरेशन केले त्याच दरम्यान सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे या घटनेने संपूर्ण भीमसैनिक हा रस्त्यावर उतरला असून आज संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना अभिवादन करत आहे त्या घटनेतील सदर पोलीस यांच्यावर 302 चा गुन्हा नोंद करावा यासाठी अनेक दलित पुढारी नेते तेथील परभणी येथील पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावे यासाठी आज त्यांनी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे या बंदमध्ये स्वतःहून व्यापारी संघटनेने देखील मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग नोंदवला आहे आज सकाळपासूनच संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये सुखसुकाट पाहावयास मिळाला आहे
माजलगाव येथे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांना अभिवादन करण्यात आले यावेळी बहुजन विकास मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबुरावजी पोटभरे तसेच मोहनरावजी जगताप आझाद क्रांती सेनेचे अध्यक्ष राजेश घोडे नवनाथ धाईजे कचरूजी खळगे अविनाश बनसोडे एडवोकेट डोंगरे विजयजी साळवे धम्मानंद भाऊ.निलेश कांबळे सत्यभामा सौंदरमल व तसेच अन्य मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोमनाथ सूर्यवंशी यांना अभिवादन करण्यात आले आणि माजलगाव शहरात शांतता राखण्याचे आव्हान करण्यात आले आहे