इंडियन न्यूज जिल्हा प्रतिनिधी वाशिम
फुलचंद भगत
वाशिम:-यशवंतराव चव्हाण CBSE स्कूल, मंगरूळपीर येथे सोमवार, १६ जून २०२५ रोजी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी एक महत्त्वाचा पालक मार्गदर्शन कार्यक्रम (Parents’ Orientation Program) घेण्यात आला.या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी आणी पालकांनी ऊत्फुर्तपणे सहभाग नोंदवत उत्साहात पार पडला.
शाळेची यशस्वी वाटचाल सुरु असुन प्रत्येक परिक्षेत या शाळेचे विद्यार्थी यशस्वी भरारी घेत आहेत.या वर्षीच्या सञाची सुरुवात पालक विद्यार्थी,शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन यांचा समन्वय होवुन चर्चा व्हावी यासाठी आयोजन केले होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका भूमिका व्यास आणि स्वाती रघुवंशी यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ, कासोळा चे अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री सुभाष पी. ठाकरे यांची विशेष उपस्थिती लाभली.
शाळेचे प्राचार्य डॉ. संजीव कुमार सिंग यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात, नव्याने प्रवेश घेतलेल्या पालक आणि विद्यार्थ्यांसाठी आजपासून त्यांच्या पाल्याच्या शैक्षणिक वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा सुरू होत असल्याचे सांगितले. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक आणि शाळा यांच्यातील सुसंवाद अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश पालकांना शाळेची ध्येये, अभ्यासक्रम, नियम, उपलब्ध सुविधा आणि पालकांकडून असलेल्या अपेक्षांविषयी सविस्तर माहिती देणे हा होता. या कार्यक्रमांतर्गत शिक्षकांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.हा कार्यक्रम पालक आणि शाळेतील शिक्षकांमध्ये सुसंवाद साधण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरला, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची दिशा मिळाली.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांचे मोलाचे योगदान लाभले.