तालुका प्रतिनिधी
चंद्रपूर.
प्रशांत ताजने
देवाडा येथे पोळा / बैल पोळा सण साजरा करण्यात आला
देवाडा येते पोळा साजरा करण्याची परंपरा आधी पासून आहे. बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा साजरा केला जातो. शेतकरी वर्ग मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात. बैलांना आंघोळ घातली जाते. बैलांच्या गळ्यामध्ये माळा, पायांमध्ये घुंगरू, शिंगांना बेगड आणि पाठीवर झुल इत्यादी गोष्टींची बैलांना सजवले जाते. पोळा साजरा केल्यास शेतामध्ये भरपूर धान्य पिकते आणि गोधन वाढते, असे म्हणतात. भारतीय जनता पार्टी, देवाडा वतीने भाजपा युवा नेता आशीष मासिरकर, भाजपा महिला आघाडी सौ वृंदाताई काळे माजी कमलाकर येडमे, प्रशांत ताजने, सुनील मुळे, रवींद्र उपरे, केशव उपरे ग्रामपंचायत सदस्य, चापलेजी, डॉक्टर. ताजने मॅडम, निर्मला सलामे, वडस्कर ताई, असंख्य भाजपा कार्यकर्त्यांच्या उपस्थित बैल पोळा सणानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा देण्यात आला
या प्रसंगी देवाडा येते खूप गर्दी जमली होती