सोन्नाथडी येथे पेव्हर ब्लॉक व सिमेंट रस्त्याचे उद्घाटन
पत्रकार परमेश्वर चांदणे इंडियन टीव्ही मराठवाडा चिफ ब्युरो
माजलगाव – तालुक्यातील सोन्नाथडी येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील पेव्हर ब्लॉक व गावाअंतर्गत सिमेंट रस्ता या दोन विकास कामांचे उद्घाटन मा. सभापती अशोक आबा डक (मा. कृषी उत्पन्न बाजार समिती, मुंबई) यांच्या हस्ते शनिवारी सकाळी ११ वाजता करण्यात आले.
यावेळी बोलताना आशोक डक म्हणाले की, “माजलगाव तालुक्यातील मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळेच मला आशिया खंडातील सर्वात मोठ्या मुंबई बाजार समितीचा सभापती होण्याचा मान मिळाला आहे. त्यामुळे या जनतेच्या विश्वासाचे ऋण म्हणून माजलगाव तालुक्यात विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. आवश्यक निधी आणून तालुक्याचा सर्वांगीण विकास घडवून आणणार आहे.”
या उद्घाटन कार्यक्रमाला सोन्नाथडीचे सरपंच केरबा तपसे, माजी सरपंच ज्ञानदेवजी वाघमारे, पंचायत समिती सदस्य मिलिंद लगाडे, उपसरपंच विष्णुपंत जिजा गोरे, भाऊसाहेब वगरे, रघुनाथ आप्पा डाके, रामेश्वर घायतिडक,जानकीराम पवार, रत्नेश्वर वाघमारे, महादेवजी वाघमारे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण वाघमारे, सेवा सहकारी सोसायटीचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य, महिला व तरुणवर्ग तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.